कोल्हापूर - नवरात्रोत्सव केवळ एक दिवसांवर आला असून अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली. त्यामुळे मूर्तीचे दर्शन सायंकाळी सातपर्यंत बंद राहिले. महासरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली. सायंकाळी साडेसातनंतर पुन्हा देवीची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.

दरम्यान, दुर्गाज्योत नेण्यासाठी राज्यभरातून नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंदिरात येऊ लागले आहेत. मंदिरातून दुर्गाज्योत प्रज्वलित करून ती आपापल्या गावाकडे नेण्याची ही परंपरा यंदाही अनेक मंडळांनी जपली आहे. उत्सव काळात मंदिरात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
दर्शन मंडप व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या मंडपाचे काम पूर्ण झाले असून आवश्यक तेथे विजेची उपकरणे बसवली जात आहेत. दर्शन मंडपात एलईडी स्क्रीनही बसवले जात असून पिण्याच्या पाण्याची सुविधाही येथे दिली जाणार आहे. अंबाबाई मंदिरासह तुळजाभवानी मंदिर, नवदुर्गा मंदिरातही तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, शहरातील उत्तरेश्वर पेठेत नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अधिक असून येथेही मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे.
भाविकांना आवाहन
श्री अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे चार वर्षे पूर्ण झाली. २६ सप्टेंबर १७१५ ला सिधोजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती.