esakal | देशावरचे गोंधळी देवी महिम्यामुळे गावतळेत 
sakal

बोलून बातमी शोधा

देशावरचे गोंधळी देवी महिम्यामुळे गावतळेत 

गावतळे (दापोली) - येथील श्री झोलाईदेवी मंदिर दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. नवरात्रीत 9 दिवस येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. गेल्या 85 वर्षांपासून गोंधळी येथे पौराणिक ग्रंथावर आधारित कथा सांगण्याची प्रथा आजच्या आधुनिक युगात भक्तिमय वातावरणात चालू आहे. 

देशावरचे गोंधळी देवी महिम्यामुळे गावतळेत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गावतळे (दापोली) - येथील श्री झोलाईदेवी मंदिर दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्‍यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे. नवरात्रीत 9 दिवस येथे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होतात. गेल्या 85 वर्षांपासून गोंधळी येथे पौराणिक ग्रंथावर आधारित कथा सांगण्याची प्रथा आजच्या आधुनिक युगात भक्तिमय वातावरणात चालू आहे. 

हे मंदिर पांडव वनवासात असताना त्यांनी बांधले, अशी माहिती आढळते. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरात टेटवली (दापोली) येथील गोंधळी कथा सांगत असत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात बारामती येथील गोंधळी व गेली 30 वर्ष सांगली येथील गोंधळी कथा सांगण्यासाठी येत आहेत. नवरात्रीत दरदिवशी रात्री 10 वाजता ग्रामस्थांचे वारकरी सांप्रदायिक भजन होते ते झाल्यावर गोंधळी कथा सांगण्यास सुरुवात करतात. सुमारे 2 ते अडीच तास आपल्या सुमधूर आवाजात ते कथा सादर करतात.

रामायण, महाभारत, विष्णूपुराण, दत्तलीला, शिवपुराण, गणेश पुराण अशा अनेक पौराणिक ग्रंथांवर आधारित कथा सांगतात. 
विशेष म्हणजे रात्री गोंधळी कथा सांगतात त्यावेळी महिलांची उपस्थिती असते. मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री अलका कुबल यांनी एका धार्मिक मालिकेसाठी या मंदिरात शूटिंग केले व मंदिराचा महिमा घरोघरी पोचवला आहे. 

84 गावची आई 
गावतळे गावची श्री झोलाईदेवी ही "84 गावची आई' असे म्हटले जाते. कारण दापोली तालुक्‍यात 84 गावांत झोलाईदेवीची मंदिरे आहेत; मात्र त्याचे मूळ स्थान गावतळे येथील हे मंदिर आहे. शिमग्यात देवीचे खेळी या 84 गावांत जाऊन देवीचा महिमा लोकांना सांगतात. त्यामुळे देवीचे मुंबई, पुणे व 84 गावांतील भक्त नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात.