करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शारदा रूपात सालंकृत पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज श्री अंबाबाईची शारदा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांची गर्दी आता वाढू लागली असून सलग सुट्ट्यांमुळे येत्या दोन दिवसात गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

आजच्या पूजेविषयी... 
आदि शंकराचार्यांची ज्ञानदात्री आराध्या म्हणजे शारदादेवी. या ज्ञानदेवतेचे पीठ कर्नाटकातील शृंगेरी येथे आहे. शारदा अंबेची अनेक स्तवने शंकराचार्यांनी रचलेली आहेत. शारदा भुजंगप्रयात हे त्यातलेच एक. जिचा देह अत्यंत सुंदर आहे. जी शांत स्वरूप आहे. जी चिंतनाच्या ही पलीकडे आहे. तिचे स्वरुप सृष्टीच्या आधी निर्माण झाले असून तापसी योगी जिथे ध्यान करतात. अशा अनंतस्वरूपी शारदा मातेची मी पूजा करतो. तिचे स्मरण करतो, असे या पूजेचे महात्म्य असल्याची माहिती श्रीपूजक मंदार मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Shri Ambabai Puja