Navratri Festival 2019 : घासातला घास, तिथे लक्ष्मीचा वास!

vaishali-joshi
vaishali-joshi

लक्ष्मीची भरपूर कृपा असलेल्या कित्येकांना समाजातील गरजूंना काही द्यावंसं वाटत नाही. मात्र, वैशाली जोशी यांच्यासारखी मध्यमवर्गीय महिला, आपल्या घासातला घास सातत्याने वंचितांना देत असतात. लक्ष्मीचा असा उपयोग हीच तिची पूजा आहे, असं त्या मानतात.

आई-वडील, सासू-सासरे यांच्या स्मृती जपण्यासाठी समाजातील गरजूंना मदत करण्याचा मार्ग वैशाली यांनी शोधला. सुरवातीला एकदा जे काही दिलं, त्यातून मिळालेलं समाधानच त्यांच्यासाठी पुढच्या वेळी देण्यासाठी, मग सतत देत राहण्यासाठी प्रेरक ठरलं. वैशाली म्हणतात, ‘‘नऊ वर्षांपासून मी देण्यातला वेगळाच आनंद अनुभवते आहे. माझे वडील विष्णू श्रोत्री आणि सासरे मधुकर जोशी यांचं निधन झाल्यावर सासूबाई सुमन यांच्याशी मी बोलले. या दोघांच्या स्मृती जपण्यासाठी गरजूंना काही देण्याची माझी कल्पना त्यांनीही उचलून धरली. मग आम्ही पाच हजार रुपयांची ठेव निवारा वृद्धाश्रमात ठेवली. तिच्या व्याजातून दर वर्षी सासऱ्यांच्या जन्मदिनी व स्मृती दिनाला तेथील वृद्धांना जेवण दिलं जातं.’’

सासूबाईंच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून वैशाली यांनी राजाराम पुलाजवळच्या मातोश्री वृद्धाश्रमातल्या आज्जी मंडळींना आनंदित करायचं ठरवलं. त्या वेळी तिथं सहावारी साडी नेसणाऱ्या साठ जणी व नऊवारी नेसणाऱ्या बारा आज्ज्या होत्या. या सगळ्यांना नवीन साड्यांची सुखद भेट त्यांनी दिली. तेथील बालसदनात वस्तीला असणाऱ्या मुलांना गणवेश दिला. कधी गोष्टींची तर कधी माहितीपर पुस्तकांची भेट त्या तेथील वाचनालयात देत असतात. स्वतःचा पन्नासावा वाढदिवस वनस्थळी संस्थेला अकरा हजार रुपयांची भेट देऊन साजरा केला. कार्यालयीन सहकारी प्रकाश जाधव यांच्या गावी (सुर्डी, ता. बार्शी) पाणी फाउंडेशनचं काम चाललं होतं. तेथील कार्यकर्त्यांच्या नाश्‍त्याची सोय केली.

देणाऱ्याने देत जावे
धनाढ्य नसूनही दानत 
चैन न करता गरजूंना मदत
 कल्पकतेनं पुस्तकांची मदत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com