Navratri Festival 2019 : जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

गणेशोत्सवानंतर ज्या उत्सवाची प्रतीक्षा असते तो म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक कला नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते. महिलांमध्ये एकजुटीची भावना जोपासली जाते. मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. स्त्री शक्तीचे दर्शन घडते व सर्व जण एकत्रितरीत्या हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करतात.

खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर किंवा व्हाट्सअँप नंबरवर आपले फोटो पाठवावेत.
sakalnavrang2019@gmail.com 
व्हॅटस्‌ ऍप क्रमांक : 7722035909

पिंपरी चिंचवडकरांसाठी सकाळ नवरंग उपक्रम 
पिंपरी - गणेशोत्सवानंतर ज्या उत्सवाची प्रतीक्षा असते तो म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धार्मिक कला नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव आहे. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते. महिलांमध्ये एकजुटीची भावना जोपासली जाते. मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. स्त्री शक्तीचे दर्शन घडते व सर्व जण एकत्रितरीत्या हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करतात. हाच उद्देश प्राधान्याने नवरात्रातील नवरंगांमध्ये आहे. याच उद्देशाने नवरात्रोत्सवाच्या या काळात नवरंगांचा हा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे सकाळ च्या वतीने "जागर आदिशक्तीचा नवरंग उत्सव' साजरा होत आहे. शारदीय नवरात्रीला आज (ता.29 ) पासून सुरूवात होत आहे. ठिकठिकाणच्या देवी मंदिरातून आणि घरोघरी श्रद्धेने हा उत्सव साजरा होत असतो. 

यांमध्ये नऊ दिवस नऊ रंगांची वेशभूषा परिधान करायची आहे व ती छायाचित्रे महिलांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर व मोबाईल क्रमांकावर पाठवायची आहेत. त्या दिवसाच्या रंगाचा फोटो त्याच दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत पाठवावेत. सदर फोटो त्याच दिवसाचे व त्याच रंगाचे असावेत. ग्रुप फोटोमध्ये 4 पेक्षा जास्त महीलांचा समावेश असावा. फोटो पाठविताना सोबत ग्रुपचे नाव, कंपनीचे नाव, सोसायटीचे नाव देणे आवश्‍यक आहे. पुढच्या रंगाचे फोटो आधीच पाठविल्यास त्याला प्रसिद्धी दिली जाणार नाही. सर्व छायाचित्रांमधून रोज एक "फोटो ऑफ द डे ' निवडण्यात येणार असून त्याला आकर्षक भेटवस्तू ही दिली जाणार आहे. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड हे आहेत. या छायाचित्र निवडण्याचे व नाकारण्याचे अंतिम आधिकार हे सकाळ व्यवस्थापनाकडे असतील. 

खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर किंवा व्हाट्सअँप नंबरवर आपले फोटो पाठवावेत.
sakalnavrang2019@gmail.com 
व्हॅटस्‌ ऍप क्रमांक : 7722035909


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019Sakal Navrang