esakal | बेळगाव - ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ पुस्तकाला टॉप-१० चा मान
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव - ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ पुस्तकाला टॉप-१० चा मान

‘पॅट्रिआरची अँड द पँगोलिन’ हे त्यांचे पहिले पुस्तक आहे.

बेळगाव - ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ पुस्तकाला टॉप-१० चा मान

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवती आज साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवताना दिसून येत आहेत. आदिती पाटील यांनी लिहिलेल्या ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ या पुस्तकाने भारतीय लेखिकेकडून लिहिलेल्या पुस्तकामध्ये टॉप १० चा मान मिळविला आहे. आदिती यांनी विनोदी आणि व्यंगात्मक शैलीने पुस्तकामध्ये आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृती, जातीभेद, विलुप्त होत जाणारे वन्यजीव आदींबाबत असलेली राजकीय उदासीनता त्यांचे यथार्थ विवरण केले आहे.

आदिती पाटील या मूळच्या बेळगावच्या असून सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कार्यरत आहेत. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांनी देशाच्या विविध भागात शिक्षण घेतले. विविध संस्कृती पाहिली. पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि त्यांच्याकडून शिवारात रोपांचे कशाप्रकारे संगोपन केले जाते, रोप लागवड करताना हवामानाचा विचार केला जातो का, रोप लागवड केल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो की तोटा, यासह विभागात विलुप्त होत जाणारे वन्यजीव, जंगले, अजूनही कायम असलेला जातिभेद यासह विविध विषयांवर त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. पुस्तकामध्ये गुजरात, ओरिसा व उत्तराखंड येथील परिस्थितीवर भाष्य आहे.

हेही वाचा: अजित पवारांच्या अडचणीत वाढ?निकटवर्तीयांकडे income tax छापेमारी

पाटील यांनी अहमदाबाद येथील सेंटर फॉर इंव्हीरॉनमेंट अँड सोशल कंन्सर्न्स या कंपनीबरोबर संशोधनाचे काम केले आहे. ‘पॅट्रिआरची अँड द पँगोलिन’ हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. न्यूयॉर्कमधील इलेक्ट्रिक लिटरेचर या संस्थेतील लेखिकेने तिला आवडलेल्या भारतातील दहा नूतन लेखिकांची सूची बनविली आहे. तीत ‘पॅट्रिआरकी अँड पँगोलिन’ या पहिल्याच पुस्तकाला मानाचे स्थान मिळाले आहे. पाटील यांनी अहमदाबाद येथील इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिला वडील परशराम विष्णू पाटील व आई सुरेखा पाटील यांचे प्रोत्साहन मिळते.

"लहानपणापासून विविध पुस्तके वाचली. संशोधन करीत असताना पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. निसर्ग संरक्षण व संवर्धन प्रकल्पांवर काम केले आहे. त्याचाही चांगला लाभ झाला. तसेच कोलंबिया युनिवर्सिटी व गुजरात वनखात्याबरोबर काम करण्याचा अनुभव देखील चांगला होता."

- आदिती पाटील, लेखिका

हेही वाचा: सात स्पर्धकांवर पडली भारी, गृहिणीने घेतली सुवर्णभरारी

loading image
go to top