Navratri, ९ वनस्पती : पचनसंस्थेपासून ते वीर्यवृद्धी, वाचा कोहळ्याचे औषधी गुणधर्म

दसऱ्यापर्यंत आपण ९ औषधी वनस्पती, देवीचे कवच आणि त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.
Navaratri 2022
Navaratri 2022esakal

डॉ. चंद्रकांत शहासने

Navratri 2022 : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्साह आहे. गरबा, उपवास या पलीकडे नवरात्रीचे आयुर्वेदातही महत्त्व आहे. दसऱ्यापर्यंत आपण ९ औषधी वनस्पती आणि गुणधर्म जाणून घेणार आहोत.

Navaratri 2022
Navaratri Festival 2022 : जोतिबा मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

चौथी नवदुर्गा : कुष्मांडा : कोहळा या वनस्पतीचे संस्कृत नाव कुष्मांडा असे आहे

।। कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।

ब्रह्मदेवाने मार्कंडेय ऋषींना दिलेल्या देवी कवचात ।। कूष्माण्डेति चतुर्थकम् ।। असे लिहीलेले आहे. (9 Ayurvedic Plants of 9 Goddess of Navratri)

Navaratri 2022
Navaratri Festival 2022 : २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उदघाटन

मार्कंडेय वैद्यकीय उपचार पद्धतीत ज्या ९ औषधी वनस्पतींना मानाचे स्थान आहे त्या ९ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला दिसतात. या वनस्पतींपैकी कुष्मांडा म्हणजेच कोहळा या वनस्पतीची माहिती व औषधी गुणधर्म आपण करून घेऊ या.

Navaratri 2022
Navaratri 2022 : देवीला वारानुसार अर्पण करा हे नैवेद्य; जाणून घ्या महत्व

कोहळ्याचे आयुर्वेदातील महत्त्व

१) पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात.

२)निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तात रूपांतर होते. या प्रक्रियेत कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते.

३) वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे.

४) कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कुष्मांडा अर्थात कोहळा हे फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास हे सर्व फायदे मिळतात.

Navaratri 2022
Navaratri 2022: 'हर हर शंभू' नंतर अभिलिप्साचं 'नव दुर्गे नमो नमः' व्हायरल

कोहळ्यातील पोषक घटक : प्रति १०० ग्रॅम प्रमाण

  • कॅलरी: १४ Kcal

  • कर्बोदके: ३.३९ ग्रॅम

  • प्रथिने: ०.६२ ग्रॅम

  • चरबी: ०.०२ ग्रॅम

  • फायबर (एकूण आहार): ०.५ ग्रॅम

  • कोलेस्टेरॉल: ०.०० ग्रॅम

  • सोडियम: ३३ मिग्रॅ

  • पोटॅशियम: ३५९.१ मिग्रॅ

  • व्हिटॅमिन ए: ९.८%

  • व्हिटॅमिन बी ६.११.३%

  • व्हिटॅमिन ई: १.१%

  • व्हिटॅमिन-सी: ३.०५%

  • कॅल्शियम: ५.१%

  • मॅग्नेशियम: ६.७%

  • फॉस्फरस: ५.०%

  • जस्त: ७.२%

  • लोह: ५.७%

  • मॅंगनीज: १२.५%

  • आयोडीन: ५.९%

Navaratri 2022
Navratri 2022: लोणारच्या कमळजा देवी मंदिराचा काय आहे इतिहास?

तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत. जसे की कोहळ्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे

दुर्गेचे ४ थे रुप, "संपूर्ण जग जिच्या पायाखाली आहे त्या कुष्मांडा मातेचे असून" दुर्गामातेचा वास "कुष्मांडा /कोहळा" या वनस्पतीत असतो.

Navaratri 2022
Kolhapur Navaratri: श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा

कुष्मांडाची नावे

कुष्मांडा वनस्पती "कोहळा", भुईकोहळा, पेठा, कुम्हडा, कुंमडा, या नावाने ओळखली जाते. शास्त्रीय नाव Benincasa hispida, syn. B. ceriferia (कुळ-Cucurbitaceae), इंग्रजी मध्ये Ash Pumpkin म्हणतात.

ही वर्षायू मोठी प्रतानरोही वेल (Tendrillar Climber) असून हिला पिवळी फुले, खोडावर केसाळ लव व फळावर राखेसारखा थर असतो.

याची देशभरात लागवड होते. याच्या फळाची भाजी करतात. जुने मुरलेले फळ औषधात वापरतात. फळ, फळांचा रस, अर्क, बियांचा गर व गराचे तेल हे औषधात वापरतात.

कोहळ्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व:

१)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.

२)आम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.

३)बुद्धी व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकाळी अनशापोटी प्यावे.

४) ४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोज सकाळी घेतल्याने थुंकी ,नाक, लघवी,मुळव्याधमार्गे होणारा रक्तस्राव कमी होतो.

५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कापडी पट्ट्या कोहळ्याच्या रसात भिजवून डोळ्यावर ठेवाव्यात.

६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस + गव्हाचे सत्व १/२ चमचा + खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे. नंतर १२ सूर्यनमस्कार घालावेत.

कोहळा आणि स्थूलता

नवरात्रीचा सण साजरा करीत असताना मार्तंड पुराणातील या दुर्गा कवचाचा सखोल अभ्यास केला की आपल्याला समजते की कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, तसेच त्याचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे.

हा संस्कार/ संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रोत्सव. निसर्गाने आपल्याला भरघोस दिलेले आहे, आपल्या संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्व दिलेले आहे. हे देवत्व कसे आहे ते वरील विवेचनावरून आपल्या निश्चितच लक्षात आले असेल. तेव्हा आपणही अजून सखोल अभ्यास करून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा विश्वशांतीचा मार्ग स्विकारावा. निसर्गाचे आशीर्वाद घ्यावेत. निसर्गाचे आशीर्वाद हेच देवाचे आशीर्वाद.

उदयोस्तू जगदंब

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.

लागली की ते अपशकुनी मानले जाते. बऱ्याच घरात कोहळा आणणे, शिजविणे निषिद्ध असते. तसेच दृष्ट, बाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ घराबाहेर टांगतात.

(लेखक हे पुण्यातील निसर्गोपचारक व संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com