esakal | नवरात्रउत्सवात उपवासाला ट्राय करा घरी बनवलेले केळी चिप्स ; जाणून घ्या रेसीपी : Banana Chips
sakal

बोलून बातमी शोधा

Banana Chips

नवरात्रउत्सवात उपवासाला ट्राय करा घरी बनवलेले केळी चिप्स

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

शारदीय नवरात्रउत्सवाचा (Shardiya Navratri 2021) आज पाचवा दिवस. तसेच रंगामध्ये पांढरा रंग. महिला, अनेक पुरुष हे पांढरा रंग परीधान करत असतात. काही काही लोक तर आहारात ही पांढरा रंग असणारे पदार्थ खाणे पसंद करतात. यात मग दुध, केळी यांना जादा प्राधान्य दिले जाते. नवरात्रउत्सवात बऱ्याच लोकांचे उपवास (Fast) असतात. रोज खजूर, दुध आणि फळे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवलेले केळी चिप्स (Banana Chips Recipe) खाण्यासाठी ट्राय करू शकता. केळामध्ये पोटॅशिअम, विटामिन बी, विटामीन सी हे पोषक तत्वे असतात. तुम्हाला एनर्जी तर देतीलच शिवाय दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होईल. जाणून घेऊया केळी चिप्स रेसापी..

असे बनवा केळी चिप्स

साहित्य

कच्ची केळी ६

सेंदेलोन मीठ

काळी मिरी पावडर

तुप

आमचूर पावडर

कृती :

कच्या केळाचे चिप्स बनवण्यासाठी सुरवातीला केळीची साल काढून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये सेंदेलोन मीठ टाकून त्यात केळाचे बारीक बारीक काफ करून टाकून घ्या. यामुळे केळाचे काफ काळे पडणार माहीत. मिठाच्या पाण्यात १० ते १५ मिनिटे हे काफ ठेऊन द्या. १५ मिनिटानंतर केळाचे काफ पाण्यातून काढून सुती कपड्यावर ठेऊन द्या. जेणेकरून यातील सर्व पाणी निघून जाईल.

आता गॅसवर कढईत तुप घालून गरम करून द्या.त्यात एकएक केळाचे काफ टाकून क्रिप्सी होईपर्यत तळून घ्या. तळून झाल्यावर केळावरती काळे मिरे आणि सेंदेलोन मीठ टाकून घ्या. काही लोक आमचूर पावडर उपहासाला खात नाहीत. पण जे लोक खातात त्यांनी टेस्ट येण्यासाठी पर्याय म्हणून तुम्ही वापरू शकता. झाले तुमचे गरमा गरम चिप्स तयार. हे तुम्ही चहा सोबत ही खाऊ शकता.

टीप: केळी तुम्ही दुधात टाकून ही खाऊ शकता. किंवा फक्त दुध किंवा केळ ही खाऊ शकता.

loading image
go to top