श्रीक्षेत्र मनुदेवी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

यावल - सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. यात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते सपत्नीक मनुदेवी येथे घटस्थापना व महापूजा करण्यात आली. 

यावल - सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. यात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते सपत्नीक मनुदेवी येथे घटस्थापना व महापूजा करण्यात आली. 

सकाळी अकराला जिल्हाधिकारी मनुदेवी येथे येणार म्हणून परिसरातील संस्थांचे सर्व पदाधिकारी वेळेवर हजर होते. जिल्हाधिकारी निंबाळकर जळगाव येथे आल्यानंतर प्रथमच त्यांनी सपत्नीक आई मनुदेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते मनुदेवीचा घटपूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत यावलचे तहसीलदार कुंदन हिरे, जळगाव जि. प. उपमुख्ख कार्यकारी अधिकारी, यावल गटविकास अधिकारी वाय. पी., सपकाळे, किनगाव मंडळाधिकारी तुषार घासकडवी, यावल पं. स. सभापती पल्लवी चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरोजित चौधरी, मनुदेवी संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव निळकंठ चौधरी, विश्‍वस्त भाऊराव पाटील, भास्कर पाटील, चिंधू महाजन, सोपान वाणी, प्रा. भास्कर पाटील, मनुदेवी विद्यालयाचे मुख्खाध्यापक प्रा. बी. पी. पाटील, लिपिक महेंद्र पाटील व आडगाव येथईल ग्रामसेवक डी. व्ही. सोळुंके, तलाठी तडवी, कासारखेड्याचे ग्रामसेवक, आडगाव कासारखेडा येथील शेकडो ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yaval news manudevi navratrotsav