#परदेशातील बाप्पा  सेनेगलमध्येही ‘बाप्पा’चा जयघोष

vishwaganesh
vishwaganesh

डकार (सेनेगल) - पश्‍चिम आफ्रिकन देश सेनेगलची राजधानी डकार येथे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजतगाजत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली.

यंदा गणेशोत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ नित्यपूजा, आरती होत असते. सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. सेनेगलमध्ये वास्तव्यास असणारे भारतीय बांधव मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होतात. सेनेगलमधील भारताचे राजदूत जी. श्रीनिवास यांनीही सहकुटुंब ‘श्रीं’चे दर्शन घेऊन उपक्रमाचे कौतुक केले.

मंडळाचे अध्यक्ष संदीप देशमुख बारामतीचे असून दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूर्ती पुण्यातून आणण्यात पुढाकार घेतात. केवळ मराठीच नव्हे तर पंजाबी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आदींचा या उपक्रमात सहभाग असतो. श्रीनिवास अमरापूरकर, चंदन पंडोरे, सागर देशमुख, संतोष दोरक, श्रीकांत पुजारी, स्वप्नील देशमुख, प्रज्ञेश गुरव, किरण घोडेकर, संदेश देशमुख, देवेश पाटकर, पवन नानोरे, अमर वाळके आदी कार्यकर्ते हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com