esakal | "हीच ती वेळ : यही है वो वक्त...वाचा नेमकं काय आहे... 

बोलून बातमी शोधा

gmfb1.jpg

तीसहून अधिक प्रसिध्द मराठी कलाकार एकाचवेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत असून ते विविध गाणी, नृत्य व कथावाचन करणार आहेत. त्यामुळे सर्व रसिकांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी असणार आहे. 

"हीच ती वेळ : यही है वो वक्त...वाचा नेमकं काय आहे... 
sakal_logo
By
तुषार कर्णिक

दुबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच देशांच्या अर्थकारणालाही जबरदस्त धक्का बसला आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत. याचप्रमाणे कोरोनाचा महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने मुंबई-पुण्यासारख्या महानगरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे.

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...

यामध्ये आता दुबईस्थित "जीएमएफबी ग्लोबल' या संस्थेने देखील मुंबई प्रोजेक्‍ट संस्थेशी संलग्न होऊन आपला मदतीचा हात त्यांच्या पुढील कार्यासाठी पुढे केला आहे. "जीएमएफबी ग्लोबल'तर्फे "हीच ती वेळ : यही है वो वक्त : This is the Moment ' या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या फेसबुक पेजवरून 30 मे रोजी रात्री 9 वाजता करण्यात आले आहे. 30 हून अधिक मराठी प्रसिध्द कलाकार एकाचवेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत असून ते विविध गाणी, नृत्य व कथावाचन करणार आहेत. त्यामुळे सर्व रसिकांसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी असणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामध्ये कोविड रुग्णालयांना आणि कोविड योध्दांना मदत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भविष्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन शाळांच्या बांधणीत सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांना मदत देखील करण्यात येणार आहे. या कार्यात समाजातील सर्व स्तरावरील लोकांचा त्यात सहभाग घ्यावा यासाठी या ऑनलाइन कार्यक्रमात "जीएमएफबी ग्लोबल' आणि मुंबई प्रोजेक्‍टच्या कार्यासाठी कशाप्रकारे मदत करता येईल याची विस्तृत माहिती देण्यात येईल.