'अमेरिका माझ्या नजरेतून' ची शंभरी

Aparna Bhave writes about her youtube channel in USA
Aparna Bhave writes about her youtube channel in USA

नमस्कार ! मी अपर्णा , सध्या अमेरिकेच्या न्यूजर्सी राज्यात राहते ", बरोबर एक वर्षांपूर्वी या वाक्याने मी माझ्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात केली आणि बघता बघता 'अमेरिका माझ्या नजरेतून' या  youtube चॅनेल वर १०० व्हिडिओ अपलोड केले.

मी तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत आले आणि इथल्या अनेक गोष्टी पहिल्यांदाच पाहताना आश्चर्य, कुतूहल आणि आपल्या देशापेक्षा खूपच वेगळेपना जाणवला .ज्या रस्त्यांवर फूटपाथ नाहीत, त्या रस्त्यांवरून चालताच येत नाही ! एकदा आणलेलं दूध १५ दिवस टिकत , १ बेडरूम , २ बेडरूम घरामध्ये किती जणांनी राहायचं याचेही नियम ठरलेले .

सुरुवातीला अश्या गोष्टींचे छोटे छोटे व्हिडिओ काढून नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना whatsapp च्या माध्यमातून पाठवले. अर्थातच नवीन गोष्टी पाहायला सगळ्यांनाच आवडल्या.

अमेरिकेत येताना तुमचा व्हिसा हा 'वर्क व्हिसा ' नसेल तर इथे नोकरी करतायेत नाही.IT इंडस्ट्री मध्ये येणाऱ्या बऱ्याच जणांबरोबर डिपेंडन्ट व्हिसा वर येणाऱ्या अनेक ऊचाशिक्षित स्रियांची हीच तर्हा ...त्यापैकीच मी एक . पण चांगली बाजू अशी कि इथे आल्यावर बराच रिकामा वेळ आणि २४ तास इंटरनेटची उपलभडता यामुळे इंटरनेटवरील YouTube वरील वेगवेगळी माहिती पाहता आली. 

त्यातच ओळखीच्या एक दोघा जणांनी YouTube वर स्वतःचे चॅनेल सुरु केले आणि कल्पना सुचली , आपल्यालाही एक चॅनेल सुरु करून इथे दिसणाऱ्या नवीन गोष्टी जास्ती लोकांपर्यंत पोहोचवता येतील. YouTube  वर थोडंफार शोधकाम केल्यावर असं लक्षात आलं कि मराठीतून अशी माहिती देणारा एकही चॅनेल सध्या अस्तित्वात नाही. ' शुभस्य शीघ्रम ' म्हणत सुरुवात झाली मराठीतून अमेरिकेच दर्शन घडवणाऱ्या YouTube चॅनेल ची 'अमेरिका माझ्या नजरेतून ' ची सुरुवात केली ती इथलं घर आणि घरातल्या Laundry , डिशवॉशर ई. व्यवस्थांबद्दल .

घराचा व्हिडिओ करताना एका Architect मैत्रिणीला बोलवून " इथली घर लाकडाची का असतात?"आणि इतर काय विशेषता असतात ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्यामुळे हा प्रयत्न लोकांना आवडला आणि व्हिडिओ viral झाला. मग नायगारा धबधबा , न्यूयॉर्क , कॅलिफोर्निया असे पर्यटन विषयक व्हिडिओ बनवले. इथले वेगवेगळे सण जसे हॉलोवीन , थॅंक्सगिविंग , पानगळती आणि बर्फवृष्टी सारखे वेगळे ऋतू , सगळीकडे आढळणारे यांत्रिकीकरण , अमेरिकेतील भारतीय मंदिरे , इथे साजरे होणारे भारतीय सण , भारतीय योगअभ्यासाचा अमेरिकेतील प्रसार , भारतीय स्वातंत्र्य दिनाची अमेरिकन रस्त्यावरची परेड, अमेरिकेतील गणेशोत्सव अश्या  वेगवेगळ्या विषयांवरचे बघता बघता १०० व्हिडिओ चॅनेल वर प्रदर्शित झाले

(हे सगळे व्हिडिओ आपण https://youtu.be/4feyOZHptPQ या लिंक वर क्लिक करून कधीही बघू शकता.)

१०० व्हिडिओच्या प्रवासात बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला एडिटिंग ची सवय नसल्याने एक व्हिडिओ बनवायला वेळ लागायचा हळूहळू त्याची सवय झाली . कॅमेरा समोर कसं बोलायचं? विशेष करून चेहेऱ्यावरचे हावभाव आणि जास्तीत जास्त उत्साहवर्धक दिसणं याला किती महत्व आहे , ते शिकायला मिळालं. अनेक नवीन लोकांच्या ओळखी झाल्या . व्हिडिओ जास्तीतजास्त माहितीपूर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेक विषयांची माहिती झाली. 

Youtubeचॅनेल बघणाऱ्याला हे प्रकरण सोप्पं वाटत असलं तरी यातही अनेक challenging गोष्टी आहेत. अमेरिकेसारख्या परक्या देशात कुठलं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं चालेल आणि कुठे परमिशन घ्यावी लागेल हे आधी पाहावं लागत, बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी आधी परवानगी घ्यावीच लागते, नाही ऐकण्याची तयारी ठेवावी लागते (उदा. इथल्या सार्वजनिक वाचनालयाची पद्धत अतिशय चांगली आणि स्तुत्य आहे पण तिथलं रेकॉर्डिंग करण्याची परवानगी न मिळाल्यामुळे भारतातल्या लोकांपर्यंत मी हे पोहोचवू शकले नाही). 
  काही वेळेस एखाद्या पार्टनस्थळाचं उत्साहानं चित्रण करायला गेलं कि निम्यातूनच मोबाईल मधली जागा संपली म्हणून घरी यावं लागलं . गर्दीच्या ठिकाणी आवाज चांगला यावा म्हणून माइक घेतला, तर व्हिडिओ स्टॅबिलाझशन साठी घेतलेल्या गिम्बल आणि माइक एकाच वेळेस फोनला जोडता येईना. कधीतरी घरी आल्यावर समजलं, उत्साहाच्या भारत माइक चालू करायचाच राहिला त्यामुळे अनेक चांगले शॉट्स व्हिडिओ मध्ये घेता आले नाही. या झाल्या फक्त तांत्रिक गोष्टी त्याचबरोबर एखाद्या विषयावर कितीही परिपूर्ण वाटणारा व्हिडिओ बनवला, तरीही काही गोष्टी राहून जातात आणि मग एखादा सुजाण प्रेक्षक ' ही गोष्ट व्हिडिओ मध्ये समावेश करण कसं आवश्यक होतं ' ते सांगतो आणि मग आपण कसे काय विसरलो ? याच वाईट वाटत. काहीदा व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या गोष्टींचा विपर्यासही केला जातो. 

पण या सगळ्यापेक्षा अनेक जणांकडून येणाऱ्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया उत्साह वाढविणाऱ्या आणि हा प्रवास चालू ठेवायला प्रेरणा देणाऱ्या असतात.काही जणांनी घरातल्या वृद्ध व्यक्तीची नायगारा बघण्याची इच्छा पूर्ण करता आली त्याबद्दल आभार मानले , इथे येणाऱ्या काही जणांना laundry सिस्टिम सारख्या व्हिडिओ चा उपयोग झाला , तर काही जणांचे अमेरिकेबद्दलचे गैरसमज दूर झाले आणि या सगळ्यांनी त्यांच्या भावना व्हिडिओ वरील कंमेंट्स च्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवल्या आणि केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. गेल्या एका वर्षात मी माझ्या चष्म्यातून अनेक गोष्टी मराठी प्रेक्षकांना पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला,  यापुढे माझ्यापेक्षा अधिक काळ इथे राहिलेल्या काहीजणांकडून या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा आणि या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न असेल .

'अमेरिका माझ्या नजरेतून ' या चॅनेलच २५ हजार जणांचं कुटुंब झाल्यानंतर या चॅनेलचा परीघ अजून मोठा करायचा आहे .अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मंडळाचं काम बरंच मोठं आहे त्या माध्यमातून अनेक प्रतिथयश लोकांच्या ओळखी झाल्या आहेत. या सगळ्या अनुभवी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वांशी मी गप्पा मारणार आहे ' गप्पागोष्टी ' या नवीन सत्रामध्ये . या गप्पारूपी मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा इथला प्रवास , त्यांनी मिळवलेलं यश,  त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्था , अमेरिकेतलं राजकारण , इथले उद्योग , शिक्षण व्यवस्था , इथल्या लोकांचं राहणीमान इत्यादी अनेक विषयांवर व्हिडिओ तयार करायचा मानस आहे. या सत्रातील अमेरिकेतील शिक्षण आणि अमेरिकेतील एव्हिएशन इंडस्ट्री याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ चॅनेल वर प्रदर्शित झाले आहेत. 

आत्तापर्यंतच्या चॅनेल च्या प्रवासात अनेक जणांनी प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष मदत केली , प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार . असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com