अनुभव सातासमुद्रापारचे... : सहनशक्ती संपतीय, तणाव वाढतोय

Chinmay-Manohar
Chinmay-Manohar

कोविड-१९ जागतिक साथीचा जबरदस्त तडाखा झेलणाऱ्या संपन्न अमेरिकेत, एका बाजूला प्राणहानी आणि दुसरीकडे वित्तहानी - आर्थिक नुकसान, या कात्रीमध्ये व्यवस्था आणि सरकारे सापडल्याचे चित्र दिसते आहे.

सॅनफ्रान्सिस्को भागातील मोठमोठ्या कंपन्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला वर्क फ्रॉम होम ही सूचना कर्मचाऱ्यांना दिली. चीनमधल्या  वुहानमध्ये थैमान घालणारा व युरोपातल्या अनेक देशांमध्ये आलेला कोरोना हा विषाणू दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून इकडे फेब्रुवारीत माहिती झाला होता. मात्र तो इतक्या लवकर अमेरिकेचे दार ओलांडून घरात घुसेल याचा अंदाज यंत्रणांना येण्यास मार्च उजाडला.

सॅंटाकारा काउंटीने लगेच “शेल्टर इन प्लेस” हा आदेश जारी केला. कोरोनाचा प्राणघातक धोका सर्वप्रथम ओळखणारे कॅलिफोर्निया पहिल्या काही राज्यांमध्ये गणले जाईल. मात्र या भागांमध्ये सहा फुटांच्या सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू करताना औषधे, जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर जाण्याची परवानगी कायम ठेवण्यात आली. रेस्टॉरंट्स एकदम बंद केली गेली नाहीत. नंतर ती बंद केली गेली. अर्थात डाउनटाउन म्हणजे मूळ गावांतील लोक सुरुवातीला नियम पाळतच नव्हते. ‘सेंटर इन प्लेस’ हा आदेश जारी केल्यानंतर पूर्वतयारीसाठी लोकांना बारा तास दिले होते. त्या वेळेला दुकानांमध्ये. मॉलमध्ये थोडी गर्दी पाहायला मिळाली. मात्र कोरोनाचा हल्ला जबरदस्त होता. अखेर कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात “स्टे ऍट होम” आदेश जारी केला. नंतर गर्दीची सारी ठिकाणे अत्यंत कडक धोरण राबवून बंद करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे  पालन न केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली. घराबाहेर पडताना मास्क लावणे तर पुढचे किमान वर्षभर अमेरिकेत सक्तीचे राहणार हेही स्पष्ट आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अमेरिकेतल्या शिक्षण प्रणालीने या काळात लक्षणीय पद्धतीने कामकाज सुरू ठेवले आहे. पुढच्या चार-सहा आठवड्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम मुलांना घरी दिलेला आहे. गूगल क्लासरूम क्रोम बुक्स, गुगल मीट सारख्या माध्यमातून रोज ठराविक वेळेला  वर्ग घेतले जातात. त्याचप्रमाणे ज्या मुलांकडे लॅपटॉप नाहीत त्यांच्यासाठी शाळांनीच पुढाकार घेऊन सरकारच्या मदतीने लॅपटॉप आणि क्रोमबुक्स उपलब्ध करून दिले आहेत. अनेक मुलांना बाहेर जेवणे परवडत नाही. त्यांच्यासाठी अल्पदरात जेवण उपलब्ध केले आहे. 

कोरोनाचा तडाखा केवळ प्राणहानी वा वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही. अमेरिकाभर बेरोजगारीची समस्या उग्र होताना दिसते. अनेक तरुणांच्या नोकऱ्या आजच गेल्या आहेत. आणि अनेकांना त्या कधी जातील याची शाश्वती उरलेली नाही. अनेक आय. आयटी, वाहन, रेस्टॉरंट, पर्यटन आणि सेवाक्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. जूनपर्यंत परिस्थिती काहीशी निवळण्याचीही चिन्हे नसल्यामुळे लोकांची सहनशक्ती आता संपताना दिसते. ही तणावाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत जाण्याचे आव्हान यापुढच्या काळात प्रशासनाला झेलावे लागणार आहे.
( शब्दांकन : मंगेश वैशंपायन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com