अनुभव सातासमुद्रापारचे... : अमेरिकेत गरजूंसाठी धावले भारतीय

अमेरिका - गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करताना भारतीय बांधव.
अमेरिका - गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करताना भारतीय बांधव.

संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहाकार जर कुठे माजवला असेल तर तो अमेरिकेत. एकट्या अमेरिकेत अवघ्या महिनाभरातच विषाणू बाधित रुग्नांची संख्या तब्बल साडे पाच लाखांवर पोहचली आणि त्यात दिवसागणिक दोन, दोन हजार बळी पडू लागले. तेजीच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर पोहचलेली अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली.

अमेरिकेतीली बळींमध्ये इतर वंशाच्या लोकांबरोबरीनेच भारतीय वंशाच्या लोकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पूर्ण अमेरिका आज शोकाकूल आहे. अशा संकट समयी भारतीयांनी मात्र, एकजुटीने मदत कार्य आरंभले आहे. देवळे आणि गुरुद्वारा गरजूंना जेवू घालत आहेत. 

अमेरिकेच्या रॅले शहरातही भारतीय लोकांनी ताबडतोब मदतकार्य सुरू केले. एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यासाठी मास्क शिवून देण्याची जबाबदारी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पटकन उचलली आणि त्यांना शहरातील इतर हॉस्पिटलमधूनही मास्कसाठी फोन येऊ लागले. स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी ही बातमी दिल्यावर आजूबाजूच्या गावांतूनही मास्कसाठी फोन येऊ लागले. आजवर शेकडो मास्क पुरवण्यात आले आहेत. 

हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना ह्या संस्थेचे अध्यक्ष, मूळचे नाशिकचे रहिवासी मनोज पंड्या म्हणाले की, शहरातील निराश्रित लोकांसाठी चालवण्यात येणाऱ्या केंद्रातील अन्नछत्रात अन्नाचा तुटवडा भासू लागला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्वरीत चौकशी केली. गेली पंधरा वर्षे चालू असलेल्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात जेवण पुरविण्याचा अनुभव गाठीशी होताच.  हाकेसरशी सर्व नागरिक धावून आले. अभिजित देशमुख म्हणाले, ''नुसती कानोकानी बातमी पसरताच भारतीय लोकांनी  स्वतःहून मदतीचा ओघ सुरू केला. आजपर्यंत हजारो बेघर लोकांना चविष्ट शाकाहारी जेवण देण्यात आले. संस्थेने दहा हजार जेवण पुरेल इतकी सोय केली आहे. संस्थेचे प्रसाद सातघरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांत मोठी समस्या ही लॉकडाउनचे नियम पळून कार्यकर्त्याची सुरक्षा सांभाळून देवळात जेवण तयार कसे करणार ही आहे. अमेरिकेतील तयार अन्नाचे नियमही फार जाचक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हजारोंसाठी जेवण बनविणे हे मुश्कील काम असते. ह्या घडीला कामगार आणि पदार्थ दोन्हीचा तुटवडा असताना इतक्या मोठ्या संख्येत गरजूंच्या मदतीस धावून जाणाऱ्या भारतीय समाजाने अमेरिकेची मने जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com