esakal | यूएईमधील मराठी बांधवांना सुखरुप घरी आणणारे 'एअरलिफ्ट मॅन'!

बोलून बातमी शोधा

SANTOSH KARNDE

आखातामध्ये अडकलेल्या १६८ लोकांना २० जून रोजी  एअर अरेबिया चार्टर विमानाने  शारजाह ते पुणे सुखरूप परत आणण्यात आले.

यूएईमधील मराठी बांधवांना सुखरुप घरी आणणारे 'एअरलिफ्ट मॅन'!
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अखिल अमिराती मराठी इंडियन्स (आमी) परिवार  हा एक ७००० मराठी बांधवांचा समुदाय जवळपास यूएईमध्ये आहे.  अंदाजे ३०००० मराठी रहिवाशी येथे राहतात. श्री धवल नांदेडकर, सौ. नीलम नांदेडकर, सौ. फरझाना पारकर जाबळे व श्री इंतेखांब जाबळे (ओरिएंट ट्रॅव्हल्स अधिकारी) यांच्या सहकार्याने युनाइटेड अरब इमारतमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना मातृभूमीमध्ये परतीचा मार्ग उपलब्ध करून देणारे  मुळचे मुंबईकर संतोष कारंडे हे एरलिफ्ट मॅन ठरले आहेत. 

आखातामध्ये अडकलेल्या १६८ लोकांना २० जून रोजी  एअर अरेबिया चार्टर विमानाने  शारजाह ते पुणे सुखरूप परत आणण्यात आले. त्यानंतर बऱ्याच  लोकांनी संतोष कारंडे यांना संपर्क साधून विनंती केली की अजून काही विमाने आम्हाला उपलब्ध करा, कारण बरेच लोक त्रासात होते. संतोष कारंडे यांनी  एकाही क्षणाचा विलंब न करता ओरिएंट ट्रॅव्हल्स व इतर सहकाऱ्यांसोबत अजून दोन विमाने शासकीय परवानगीसाठी अर्ज दाखल केले. त्यानंतर दोन दिवसातच विमान परवानगीच्या नियमात बदल करण्यात आला. बदल असा की आता यूएई  कंपनीच्या विमानांना भारत सरकार परवानगी देणार नाही तर फक्त भारतीय विमान कंपनीला  परवानगी देण्यात येईल. कारण जसे पहिले एअर अरेबिया विमान हे यूएई कंपनीचे  तसे येणारे दुसरे व तिसरे विमानही एअर अरेबिया  हे यूएई कंपनीचे.  त्यामुळे बदलेल्या नवीन नियमामुळे आता विमान कंपनी बदलून परत नवीन अर्ज सरकारकडे दाखल करण्याचे आव्हान समोर आल्यानंतर प्रवाशांना कळताच त्यांच्यामध्ये निराशेचे सावट निर्माण झाले. 

50 वर्षांपूर्वीच 'नॅनो'सारखी छोटी कार मराठी माणसांनी बनवली होती आणि...
संतोष कारंडे यांनी आयोजक सहकाऱ्यासह विलंब न करता इतर भारतीय  विमान कंपन्यांना संपर्क करून इंडिगो या एअर कंपनीची दोन विमाने निश्चित करून  ३४८ प्रवाशांच्या यादीसह सरकारकडे अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातील सध्याची करोना परिस्थिती पाहता सर्व काही कठीण  असल्यामुळे सरकारला पण एक मोठे आवाहन होते की एवढे लोक विमानतळावर उतरल्यावर सर्व व्यवस्था सुरळीत कशी पडेल?  यासाठी  कारंडे यांनी आम्हाला सर्वांचे विलगीकरणासाठी  हॉटेलची नोंदणी दुबईतून निघतानाच झाली पाहिजे, त्याची पूर्ण यादी अर्जाबरोबर दिली पाहिजे असे सूचित करण्यात आले. जेणेकरून मुंबईला सर्व पोहोचल्यानंतरची कार्यवाही करण्यास सुलभता होईल.  मुंबईला उतरल्यानंतर सर्वाना आपापल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची सोय सरकारकडून करण्यात आली  होती असे संतोष कारंडे यांनी सांगितले

आमी परिवाराच्या दुसऱ्या विमानाचा शासकीय परवाना ९ तारखेला मिळाला ते विमान १७४ प्रवाशांसह ११  जुलैला  दुपारी ३ वाजता दुबईहुन मुंबईला सुखरूप पोचले.  तसेच तिसरे विमानाचा परवाना ११ तारखेला मिळाला ते विमान १७४ प्रवाशांसह १४ जुलैला शारजाह ते पुणे  सकाळी ११:४० वाजता रवाना होईल असे संतोष कारंडे यांनी सांगितले. 

सर्व प्रवास्यांनी मुंबईला सुखरूप उतरल्यानंतर आमी परिवार, मुख्यमंत्री, परराष्ट्रमंत्री दूतावास अधिकारी,  विरोधी पक्ष नेते, ओरिएंट ट्रॅव्हल्स आणि इंडिगो एअर यांचे मनःपूर्वक आभार मानले.