esakal | पडद्यामागील कलाकारांना अमेरिकेतून मदतीचा हात; निधी जमवण्यास सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Drama

लॉकडाउनच्या काळात अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील पडद्यामागील कलाकारांसाठी बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका (बीएमएम) आणि कॅलिफोर्नियातील रंगमंच संस्था यांनी मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली आहे. हा मदतनिधी 15 दिवसांत 15 हजार डॉलरवर पोचला आहे.

पडद्यामागील कलाकारांना अमेरिकेतून मदतीचा हात; निधी जमवण्यास सुरुवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिकागो - लॉकडाउनच्या काळात अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील पडद्यामागील कलाकारांसाठी बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका (बीएमएम) आणि कॅलिफोर्नियातील रंगमंच संस्था यांनी मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली आहे. हा मदतनिधी 15 दिवसांत 15 हजार डॉलरवर पोचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरकेतील मराठी माणूस भारतातनू येणाऱ्या नाटकांची आतुरतेने वाट पाहत असतो. परंतु, गेला महिना-दोन महिने जगभरात कोरोनाचे संकट आहे. महाराष्ट्रातील सगळे नाट्यप्रयोग बंद पडले आहेत. अशा अवस्थेत हातावर पोट असणाऱ्या पडद्यामागील कलाकारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यांना मदत करण्यासाठी कॅलिफोर्नियातील रंगमंच संस्था आणि बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका (बीएमएम) यांनी पुढाकार घेऊन मदतनिधी सुरू केला आहे. यासाठी "बीएमएम'च्या अध्यक्षा विद्या जोशी आणि कार्यकारिणी समिती, रंगमंचचे संथापक माधव आण स्मिता कऱ्हाडे यांनी पाठबळ दिले. अमेरिकेतील अनेक नाट्यसंस्थाही यात सहभागी झाल्या. 

या मदतनिधीसाठी रंगकर्मी विजय केंकरे, अजित भुरे, प्रशांत दामले, अमेय वाघ, संकर्षण कऱ्हाडे, जादूगार जितेंद्र रघुवीर, मीना नेरुरकर आणि अनेक स्थानिक कलाकारांनी आवाहन केले. हा मदतनिधी सुरू झाल्यानंतर 15 दिवसांतच 15 हजार डॉलर जमा झाले आहेत. हा मदतीचा ओघ आणि आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. हा निधी पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी महाराष्ट्र फाउंडशनतर्फे वेगवेगळ्या संस्थांना देण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र फौंडेशनचे वैभव साठे, राजीव भालेराव यांनी सहकार्य केले. संकलित झालेल्या निधीचे वितरण 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी करण्याची योजना आहे. याचबरोबर बृहन महाराष्ट्र मंडळाने "कोविड-19'साठी हेल्पलाईन सुरू केली आहे.
हेल्पलाईन क्रमांक - 1-833-बीएमएम-एनएओएल (1-833-266-6265 ) आणि ई-मेल - covid19help@bmmonline.org येथे मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.