esakal | न्यू कॅसलमध्ये युरोपीय मराठी संमेलनाचा उत्साह
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू कॅसलमध्ये युरोपीय मराठी संमेलनाचा उत्साह

न्यू कॅसलमध्ये युरोपीय मराठी संमेलनाचा उत्साह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मराठी कला अन् मराठी बाणा हा महाराष्ट्राच्या वैशिष्टय़पूर्ण आणि समृद्ध संस्कृतीतून झळकतो. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' या शब्दात जिसे वर्णन केले जाते, त्या परंपरांनी प्रत्येक मराठी जाणणारा माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडला आहे. सिंहावलोकन केले असता असे दिसून येते की मराठी गाथा ही सातत्याने प्रगल्भ अन प्रभावशाली होत असून 21व्या शतकात तिचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे. 

'मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा' या समर्थांच्या वचनाचे यथाशक्ती पालन प्रत्येक मराठी माणूस करताना दिसतो. माय मायदेशी असो अथवा परदेशी, मराठी त्यांचे हे अनुबंध मराठी भाषकांना एकमेकांशी पुन्हा पुन्हा भेटण्यास प्रवृत्त करतात.

१९९८ मध्ये डॉरड्रेक्ट नेदरलँड येथे प्रथम युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. त्यानंतर दरवर्षी ईएमएस हे ब्रिटनमध्ये तसेच इतर युरोपियन देशात होत आले आहे.

२०१६ मध्ये अॅमस्टरडॅम येथे झालेल्या ईएमएसमध्ये पुढचे संमेलन न्यू कॅसल येथे करण्याचे सर्वानुमते ठरले. ही बातमी आल्यानंतर मराठी न्यू कॅसलवासीयांमध्ये आनंदाची प्रचंड लाट उसळली. मूठवर मराठी माणसांत बारा हत्तींचे बळ संचारले.

इएमएस २०१८ धनुष्य पेलण्याची जबाबदारी प्रमुख संयोजन समितीने लिलया स्वीकारली. प्रमुख कार्यकारी समितीत संगीता अन रोहन मुरकुडे, वर्षा संजय देशपांडे आणि मंदा जीवन जोशी या मंडळींचा समावेश आहे.

अर्थातच न्यू कॅसल च्या मराठी रसिकांचा संमेलनात हा यशस्वी सिंहाचा वाटा असणार आहे. ईएमएस 2018 हे 29,30 जून व 1 जुलै 2018 रोजी टाईन नदीवर वसलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये होणार आहे. 

माझ्या मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मेळविन ।।
मराठीच्या ह्या ओव्यांची प्रेरित हून आमचे घोषवाक्य आहे. 
'अमृतातेही पैजा जिंके जन्मास आले तर ऋणानुबंध' या थीमवर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले.

परदेशात राहत असलेल्या समस्त मराठी भाषिकांचे हे बंध त्यांना या संमेलनास भेटण्यासाठी वारंवार मोहित करताना दिसतात. म्हणूनच हे खरे ऋणानुबंध स्वतः पलीकडचे नाते असा याचा मतितार्थ अभिप्रेत आहे.

या सोहळ्यास येणाऱ्या उपस्थित जणांसाठी दर्जेदार अन् विविध मनोरंजनाचे आयोजन केले असून यात अध्यात्म, मराठी चित्रपट, विनोदी नाटक, मराठी म्युझिकल, मुलाखत, अत्यंत उच्च दर्जाचे गायन, लावणी, तसेच पाश्चिमात्य आणि भारतीय नृत्याची जुगलबंदी, Northumbrian bagpipes इ. कार्यक्रम आहेत .

पुणे येथील लीड मीडिया इव्हेंट कंपनीच्या सहकार्याने तसेच ईएमएस २०१८ संयोजकांच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्रातील विख्यात कलावंत स्थानिक आणि प्रादेशिक कलावंत वरील मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सादर करणार आहेत.

संमेलनात टाइन नदीवर क्रूज अन् न्यूकॅसल दर्शनाची (बस) सोय केली आहे. या व्यतिरिक्त खास भारतीय मेजवानीचे आयोजन केले असून त्यात विविध पुरस्कार अशा पदार्थांची रेलचेल असणार आहे. उपस्थितांच्या बारा वर्षांखालील मुलांसाठी उत्तम cliolming services ची सोय उपलब्ध केली आहे. 

असे हे धमाकेदार तीन दिवस , म्हणजे 29 जून, दुपारी 4 ते 1 जुलै दुपारी 2 वाजेपर्यंत, सुळकन वाऱ्यासारखे निसटणार आहेत. नंतर अहो मंडळी, हा कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही तरच नवल म्हणायचे.