अनुभव सातासमुद्रापारचे... : इथे भारताइतकेच सुरक्षित

मंदार खेसे, आयर्लंड
Monday, 11 May 2020

मी सध्या कामानिमित्त आयर्लंडमधील डब्लिन शहराजवळ डनबॉयने परिसरात राहत आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला. हा रुग्ण इटलीतून प्रवास करून आयर्लंडमध्ये आला होता. त्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. येथील सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने शाळा, महाविद्यालये, डे केअर सेंटर, जीम, थिएटर बंद केले. तसेच कार्यालयातील कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या.

मी सध्या कामानिमित्त आयर्लंडमधील डब्लिन शहराजवळ डनबॉयने परिसरात राहत आहे. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला. हा रुग्ण इटलीतून प्रवास करून आयर्लंडमध्ये आला होता. त्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. येथील सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने शाळा, महाविद्यालये, डे केअर सेंटर, जीम, थिएटर बंद केले. तसेच कार्यालयातील कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या. आयर्लंडमध्ये १७ मार्च रोजी सेंट पॅट्रिक दिवस हा सांस्कृतिक दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाची पाश्वर्भूमीवर लक्षात घेऊन सरकारने हा कार्यक्रम रद्द केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नाही, असे दिसून लागल्याने २७ मार्चपासून सरकारने लॉकडाउन जाहीर केले. हा लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सरकारने तातडीने पावले उचलून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची मुभा देण्यात आली होती. तेव्हापासून मीही वर्क फ्रॉम होम करीत आहे. दोन आठवड्यातून एकदाच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घरातून बाहेर पडतो. अन्यथा, घरीच राहणे पसंत करतो. येथील किराणा मालाचे शॅाप नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे खुली आहेत आणि नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतत पालन करतानाचे दिसून येते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

माझ्यासह सर्व भारतीयांनाही अभिमान वाटावे, अशीच एक बाब मला येथे भावली. सध्याचे आयर्लंडचे पंतप्रधान डॅा. लिओ वराडकर वंशाने भारतीय आहेत. ते पेशाने डॉक्टर होते. मात्र, २०१३ मध्ये त्यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय व्यवसाय सोडावा लागला. देशावर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर डॉ. वराडकर यांनी पंतप्रधान म्हणून तातडीने निर्णय घेऊन साथ आटोक्यात ठेवण्यात तर यश मिळविले आहेच. पण पंतप्रधान असतानाही आपल्या भागात आठवड्यातून एका दिवस आपली वैद्यकीय सेवा रूजू करण्याचा निर्णय घेतला आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या बहुतांश नातेवाईक आणि मित्र परिवाराला ही अशा संकट वेळी पुढे येण्याचे आव्हान केले.

देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असतानाही आपल्या वेळातला वेळ काढून प्रत्यक्ष समाजाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करणे प्रशंसनीय आहे. अशा आयर्लंडचे यशस्वी नेतृत्व करणाऱया मानवतावादी विचारांच्या नेतृत्वामुळे आम्हा भारतीयांमध्ये सुरक्षेची भावना आहे. आम्ही सर्वजण इथे सुरक्षित आहोत, हा विश्वास देण्यात आयर्लंड सरकार यशस्वी ठरले आहे हे निश्चित. 

सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर येथील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे.
(शब्दांकन - शंकर टेमघरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mandar khese says on dublin city