esakal | ‘ऐक्यम’ एका साहसाची सुरवात...
sakal

बोलून बातमी शोधा

aikyam

रुचिता भावे आणि नेहा गोगटे-गोडबोले या अभियांत्रिकी पदवीधर असून, शास्त्रीय नृत्यकलेतील प्रशिक्षित व पारंगत नृत्यांगना आहेत. दोघीही शास्त्रीय निपुणता आणि सरगम जतन करावा म्हणून एकत्र आल्या आहेत.

‘ऐक्यम’ एका साहसाची सुरवात...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिडनी (ऑस्ट्रेलिया): रुचिता भावे आणि नेहा गोगटे-गोडबोले या अभियांत्रिकी पदवीधर असून, शास्त्रीय नृत्यकलेतील प्रशिक्षित व पारंगत नृत्यांगना आहेत. दोघीही शास्त्रीय निपुणता आणि सरगम जतन करावा म्हणून एकत्र आल्या आहेत. 'ऐक्यम'द्वारे नेहा आणि रुचिताने नवीन उपक्रमात स्वत:ला झोकून दिले आहे. ऐक्यम हे व्यासपीठ, उत्कृष्ठ शास्त्रीय कलाकारांसाठी आहे. ऑस्ट्रेलियातील, पर्थ, ऍडलेड, कॅनबेरा, सिडनी, मेलबर्न आणि ब्रिस्बेन येथील कलाकारांनी संकल्पनेवर विश्वास दाखवला आहे.

त्या सांगतात की, आम्ही दोघी, गुणवत्ता व कल्पकतेचा आदर करत आहोत. आमच्या पहिल्या कलाकृतीच्या, कामगिरीने हा विचार मनात आला. 'पंचमहाभूते'- क्रियेचे शाश्वत घटक आणि उर्जेचे स्रोत. ऑस्ट्रेलियातील आम्ही 'दहा शास्त्रीय नृत्यांगना' त्या दैवी शक्तिपुढे नतमस्तक होऊन, त्यांच्याकडे ऊर्जा देण्याची मागणी करत आहोत. ज्यामुळे आम्ही या प्रत्येक संयुगाचे, वैशिष्ठ सादर करणार आहोत. सर्व सीमांना पार करून देशादेशातून एकत्र आलो आहोत, धीर द्यायला, बळ द्यायला आणि शांतता प्रस्थापित करायला...