साताराः शहर पोलिसांकडून मंडळ दत्तक योजना हाती

सचिन शिंदे
Monday, 28 August 2017

कऱ्हाड (सातारा): शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी मंडळ दत्तक योजना हाती घेतली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तो उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पाच दिवसानंतर त्या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. मंडळांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेवून त्यावर उपाय व प्रबोधन असा त्रिसूत्री कार्यक्रम पोलिस राबवणार आहे.

कऱ्हाड (सातारा): शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी मंडळ दत्तक योजना हाती घेतली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून तो उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पाच दिवसानंतर त्या योजनेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. मंडळांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेवून त्यावर उपाय व प्रबोधन असा त्रिसूत्री कार्यक्रम पोलिस राबवणार आहे.

एका मंडळाला एक पोलिस असे त्याचे सुत्र आहे. मात्र, पोलिसांच्या यादीत वादग्रस्त किंवा तापदायक ठरणाऱ्या मंडळांसाठी किमान दोन पोलिस ठेवण्यात येणार आहेत.  मागील वर्षी झालेल्या चुका सुधारून नव्याने काय बदल करता येईल, याचाही विचार या निमित्ताने पोलिसांना करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. शहरात सुमारे 360 गणेश मंडळे आहेत. तर सुमारे 18 हजार 600 घरगुती गणपती बसवले जातात. गणेशोत्सवात आजू बाजूच्या उपनगरांचा समावेश असतो.

प्रतिष्ठापना, त्यानंतरचा देखाव्यांचा उत्सव व अंतीम विसर्जन मिरवणुका अशा तीन टप्प्यात उत्सव असतो. त्या तीन टप्प्याचे पोलिसांचे बंदोबस्ताचे नियोजन असते. सर्व अधिकाऱ्यासंह किमान चारशे पोलिस येथे दहा दिवस तैनात असतात. तो उपक्रम शांततेत व उत्सहात पार पाडला जावा, यासाठी पोलिसांकडून विविध उपाय योजना हाती घेतल्या जातात. त्यापैकीच गणेश मंडळ दत्त योजनेचाही त्यात समावेश आहे. शहर पोलिसांकडून ती योजना त्रिसुत्रीवर यंदा राबवली जाणार आहे.

मंडळांच्या अडचणी समजून घेणे, त्यांनतर त्यांच्या प्रश्नांवर उपायासाठी प्रय़त्न करणे आणि प्रबोधन करणे अशी तीन टप्प्यात पोलिसांकडून प्रय़त्न केले जाणार आहेत. शहरात किमान पंधार मंडळे पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र अजेंडा तयार करण्यात केला आहे. ध्वनी प्रदुषण टाळून उत्सवात जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग घेण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले आहे. त्यासाठी पहिल्या दिवासापासून पोलिसांनी त्यासाठी प्रय़त्न केले आहेत. पहिल्याच दिवशी पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरिक्षक प्रदीप जाधव, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक प्रदीप खाटमोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पायी फिरून शहराची पहाणी केली आहे. त्यानुसार ते बंदोबस्त लावत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satata news satata ganesh utsav and karad police