गणपतीपुळे येथे सांगलीच्या एकाचा बुडून मृत्यु, दोघांना वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

रत्नागिरी - अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या सांगलीतील भविकांपैकी तिघेजण गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याच्या घटना बुधवारी सकाळी घडली. बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना येथील जीवरक्षकांनी वाचवले तर एकाचा बुडून मृत्यु झाला. सुनिल लक्ष्मण दादीमणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रत्नागिरी - अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे आलेल्या सांगलीतील भविकांपैकी तिघेजण गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याच्या घटना बुधवारी सकाळी घडली. बुडणाऱ्या तिघांपैकी दोघांना येथील जीवरक्षकांनी वाचवले तर एकाचा बुडून मृत्यु झाला. सुनिल लक्ष्मण दादीमणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

अंगारकी संकष्टी निमित्त सागली येथील सहाजण मंगळवारी रात्री गणपतीपुळेत दाखल झाले होते. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हे सहाजण आंघाळीसाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले. याचवेळी समुद्राला भरती असल्याने आंघोळीसाठी उतरलेले सहाजण खोल पाण्यात खेचले गेले. सुनिल लक्ष्मण दादीमणी (३१), दत्तात्रय मल्लाप्पा हिवरकर (३५) आणि सदाशिव बसप्पा उफळापुरे (४०, सर्व रा. हनुमानगनर, सांगली) हे तिघेजण समुद्रात बुडू लागले. यावेळी अन्य तिघाजणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ते ऐकून किनाऱ्यावरील ग्रामस्थांसह जीवरक्षकांनी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी समुद्रात उडया घेतला. 

समुद्रात बुडणाऱ्या दत्तात्रय मल्लाप्पा हिवरकर आणि सदाशिव बसप्पा उफळापुरे या दोघांना जीवरक्षकांनी जीवाची बाजी लावुन वाचवले तर सुनिल लक्ष्मण दादीमणी हा समुद्रात बेपत्ता झाला. त्याचे शोधकार्य तत्काळ हाती घेण्यात आले. जयगड पोलीस आणि जीवरक्षकांच्या मदतीने बेपत्ता सुनिल दादीमणी याचा शोध सुरू होता. अखेर बुधवारी दोन वाजण्याच्या सुमारास भंडारपुळे किनारपट्टीनजिक बेपत्ता सुनिल दादीमणी याचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मृतदेहाचा पंचानामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बुडणाऱ्या दोघांना वाचवण्यात जिवरक्षक मयुरेश देवरूखकर, अक्षय माने, अनिकेत राजवाडकर, विशाल निंबरे, आशिष माने, ओंकार गवाणकर यांच्यासह गणपतीपुळे चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Tourist death on Ganpatipule Beach