आद्य तंतुवाद्य निर्माते फरीद सतारमेकर विशेषांकाचे प्रकाशन

संतोष भिसे
बुधवार, 9 मे 2018

मिरज - महाराष्ट्रातील आद्य तंतुवाद्यनिर्माते स्व. फरीद सतारमेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत संगीत कलाविहार विशेषांक अखिल भारतीय गंधर्व मंडळाने प्रकाशीत केला आहे. त्याचे प्रकाशन मंगळवारी वसंत व्याख्यानमालेत झाले. यावेळी फरीद यांची प्रतिमा सतारमेकर कुटुंबियांच्या वतीने मिरज विद्यार्थी संघास भेट देण्यात आली. 

गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत कलाविहार या प्रसिद्ध मासिकाचा मे महिन्याचा अंक 'आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीद सतारमेकर' विशेषांक म्हणून प्रसिध्द करण्यात आला आहे. स्व. फरीद यांनी १८५o मध्ये महाराष्ट्रातील पाहिले तंतुवाद्य तयार केले. त्यानंतर मिरजेला 'तंतुवाद्याचे माहेरघर' अशी ओळख मिळाली. 

या महान कलाकाराच्या विशेषांकाचे प्रकाशन ख्यातनाम गायक, संगीत विषयाचे अभ्यासक डॉ. विकास कशाळीकर यांच्या हस्ते झाले. सुमारे ६५ वर्षापूर्वी प्रख्यात संगीतकार, अभ्यासक पद्मश्री बी. आर. देवधर यांनी फरीद सतारमेकर यांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण आणि विस्तृत लेख लिहिला होता. तो लेख या विशेषांकात पुर्नमुद्रीत करण्यात आला आहे. 

डॉ. मुकुंद पाठक, बाळकृष्ण विभुते, पांडुरंग मुखडे, मजीद सतारमेकर, अल्ताफ अमीरहमजा सतारमेकर, अल्ताफ महेबूब सतारमेकर उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Pharidsaheb satarmekar book publication