Good News: कामगारांना मिळणार आता ४५ दिवस पगारी रजा

Workers get 45 days paid leave job belgaum marathi news
Workers get 45 days paid leave job belgaum marathi news

बंगळूर : कर्नाटक वाणिज्य संस्था २०२० चे दुसरे दुरुस्ती विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर झाले. सुधारित विधेयकात कामगारांच्या पगारी रजांचे दिवस वाढविण्यास संधी आहे.
यापूर्वी ३० दिवस वेतनासह रजा होती. जर दुरुस्ती विधेयक मंजूर झाले तर हा कालावधी ४५ दिवसांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. एका वर्षाच्या आतच रजा संपविली पाहिजे, या नियमात दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आता एक वर्षानंतर प्रलंबित रजा वापरण्यास परवानगी मिळणार आहे.


कर्नाटक आणि वाणिज्य संस्था २०२० चे दुसरे दुरुस्ती विधेयक खासगी कंपन्यांनाही लागू होईल. त्याचबरोबर, २०२० च्या बागायती विज्ञान संशोधन दुरूस्ती विधेयकालाही मान्यता देण्यात आली.

संसदीय कार्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्री एमटीबी नागराज आणि भैरती बसवराज यांच्या खात्याची विधेयके सादर करण्याचा प्रयत्न केला. तथापि, सभापतींनी यास परवानगी दिली नाही.
एमटीबी नागराज आणि भैरती बसवराज या दोन्ही मंत्र्यांनी सभागृहात अनुपस्थित रहाण्याबद्दल सभागृहाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे विधेयक सादर करण्यास नकार देण्यात आला.

मंत्री बसवराज बोम्माई यांनी विनंती केली, पण सभापतींनी ते मान्य केले नाही. एमटीबी नागराज आणि भैरती बसवराज यांनी आपापल्या विभागीय अधीन संस्थांची विधेयके सादर करावयाची असतानाही, धनगर आरक्षण मोर्चाचे स्वागत करण्यासाठी सभागृहातून गेले होते.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com