बेळगावात मुंबईहून आलेल्या महिलेला कोरोनाची बाधा...

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020


आकडा 121 वर; बाधित 27 वर्षीय.. 

बेळगाव  : मुंबईहून आलेल्या आणि रामदुर्ग येथील वर्षीय महिलेलाला कोरोना झाल्याचे आज  निदान झाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 121 झाली. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई येथून आलेल्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. रामदुर्ग तालुका देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. मुंबई येथून आल्यानंतर सदर महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. या महिलेची वैद्यकीय तपासणी अहवाल प्रयोगशाळेला पाठविला होता. अहवाल आज प्राप्त झाला असून, त्यामध्ये संशयिताला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग -  सिंधुदुर्गात सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह..

 जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 121 झाली आहे. त्यापैकी 70 जणांना डिस्चार्ज दिला आहे. एकाचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय कोरोना कक्षात 49 जणांवर उपचार सुरु आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive a woman from Mumbai in Belgaum