दुसरे नाट्यगृह गरजेचेच : सुबोध भावे

Second theater needs- Subodh Bhave
Second theater needs- Subodh Bhave

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह राज्यातील सुंदर नाट्यगृह असून कलापूरसाठी आता दुसऱ्या नाट्यगृहाचीही गरज असल्याचे आज अभिनेता सुबोध भावे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात "अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.

शनिवारी येथील प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यानंतर रात्री सुबोधने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाबाबतचे ट्‌विट केले होते. या नाटकाचा आता 9 फेब्रुवारीला शेवटचा "डिमांड शो' येथे होणार आहे. 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पहिल्या टप्प्यातील काम चांगले झाले आहे. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधी आणि शहरासाठी दोन ते अडीच हजार क्षमतेच्या बहुउद्देशीय नाट्यगृहासाठी सर्व नाट्य संस्था, रसिकांचा पाठपुरावा सुरू झाला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णयाची ग्वाही दिली आहे. याबाबत सुबोध भावे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "" कोल्हापूर ही कलानगरी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथे कलेला आश्रय दिला. अनेक दिग्गज कलाकार येथे घडले. चित्रसृष्टीची सुरवातच येथून झाली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाबरोबरच आता दोन ते अडीच हजार आसन क्षमतेच्या दुसऱ्या नाट्यगृहाची नक्कीच गरज आहे. त्यामुळे नाटकांबरोबरच संगीत महोत्सव किंवा मोठ्या सांगितिक कार्यक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. या नाट्यगृहाचे कामही अधिक दर्जेदार व्हावे.'' 

कोल्हापुरातील सर्व कलाकार, कला संस्था व रसिकांच्या मागणीनुसार शहरातील दुसऱ्या बहुउद्देशीय नाट्यगृहाच्या मागणीला गती मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. यासाठी आम्ही काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करतो आहे. येत्या काळातही तो कायम ठेवणार आहोत. लवकरात लवकर दुसरे बहुउद्देशीय नाट्यगृह उभे रहावे, हीच प्रामाणिक इच्छा आहे. 
- पंडित कंदले 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com