esakal | "हम तुम्हे मारेंगे... जरूर मारेंगे, बंदुक भी हमारी.. गोली भी हमारी'
sakal

बोलून बातमी शोधा

007 gang video viral on social media

झिरो झिरो सेव्हन (007) म्हणजे जेम्स बॉंड. आणि जेम्स बॉंड म्हणजे दृष्टाचा खातमा करणारा; पण कालपासून झिरो झिरो सेव्हन म्हणून सोशल मीडियावर फिरणारी क्‍लिप दुष्ट प्रवृत्तीचा उदोउदो करणारी आहे. एन्कांऊटरच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या गॅंगचे नाव झिरो झिरो सेव्हन आहे. सुपारी घेऊन एखाद्याला उडवणे, तरूण पिढीला अंमली पदार्थाच्या व्यसनी लावणे हा त्यांचा काळा धंदा आहे.

"हम तुम्हे मारेंगे... जरूर मारेंगे, बंदुक भी हमारी.. गोली भी हमारी'

sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर - झिरो झिरो सेव्हन (007) म्हणजे जेम्स बॉंड. आणि जेम्स बॉंड म्हणजे दृष्टाचा खातमा करणारा; पण कालपासून झिरो झिरो सेव्हन म्हणून सोशल मीडियावर फिरणारी क्‍लिप दुष्ट प्रवृत्तीचा उदोउदो करणारी आहे. एन्कांऊटरच्या निमित्ताने कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या गॅंगचे नाव झिरो झिरो सेव्हन आहे. सुपारी घेऊन एखाद्याला उडवणे, तरूण पिढीला अंमली पदार्थाच्या व्यसनी लावणे हा त्यांचा काळा धंदा आहे. पण त्यांनी तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी आपल्या दिलखेचक क्‍लिप्स तयार केल्या आहेत. वास्तविक गुंड म्हणजे त्यांनी दडून राहिले पाहिजे; पण हे गुंड स्वतःहून झळकत आहेत. 

हे पण वाचा - तर... माझ्यावर, माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी गोळ्या झाडल्या असत्या... 

राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील शाम पुनिया बिष्णोईची ही गॅंग म्हणजे वाईटातले वाईट जे आहे त्याचे प्रतीक आहे. या गॅंगने खून केले आहेत. हाणामारी केली आहे. लुटालुट केली आहे. बलात्काराचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. तरूण पिढीला बरबाद करण्यासाठी नशीले पदार्थ त्यांच्याकडे आहेत. "हम तुम्हे मारेंगे... जरूर मारेंगे, बंदुक भी हमारी.. गोली भी हमारी' हे त्यांच्या गॅंगचे ब्रिदवाक्‍य आहेत. वास्तविक अशी कृत्ये करणाऱ्या गॅंगने दडून दडून राहिले पाहिजे. पण यांची गॅंग सुसाट आहे. राजस्थान, पुणे, मुंबई ते पार कर्नाटकातील हुबळीपर्यंत त्यांचे लागेबांधे आहेत आणि विशेष हे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले फॅन्स तयार केले आहेत. तरूणांना आकर्षित करण्यासाठी नेमके काय शायनिंग केले पाहिजे हे त्यांना माहित आहे. आणि आपल्या फॅन्सच्या माध्यमातून त्यांचे काळेधंदे उघड सुरू आहेत. त्यांचे एकूण वर्तन पाहता पोलिस, कायदा, कोर्ट हे शब्द त्यांनी बाजूलाच ठेवले आहेत. आपलेच राज्य आहे या थाटात ते वावरत आहेत. अलिशान गाड्यांचा वापर, फटाके उडवावेत तसे उडवले जाणारे पिस्तुलाचे बार आणि दादागिरीतील त्यांचे जगणे हे सारे ते मुद्दामपणे उघडपणे करून तरूणांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. वाईट हे की तरूण पिढी त्यांच्या या चमकोगिरीकडे आकर्षित झाली आहे. 

हे पण वाचा - साहेब, चित्रपटापेक्षाही भयानक परिस्थिती होती... कोल्हापूर एन्काउंटरचा असा थरार.... 

म्हणून त्यांना आत्ताच ठेचण्याची गरज 
नेमके हेच कमी अधिक प्रमाणात कोल्हापूर, पुणे, इचलकरंजी, सांगली परिसरात घडत आहे. अनेक गुंड, मटकेवाले, जुगारवाले, खासगी सावकार आपले उदात्तीकरण या 007 गॅंग सारखेच करत आहे. मटका जुगाराशी संबधित असलेल्या ठराविकांनी आपल्या टोळ्याच तयार केल्या आहेत. आता तर कोल्हापूरात चौकाचौकात वाढदिवस साजरे करून हे काळेधंदेवाले आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षरशः मांडव, हारतुरे, फलक याचा खर्च ते स्वतःच करत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने तरूणांना पन्हाळा, विशाळगड, सादळे मादळे, गोवा, समुद्रातला जुगार या ठिकाणी झुंडीच्या झुंडीने नेत आहेत. आणि पेठापेठात तालमीतालमीत आपले फॉलोअर्स तयार करत आहेत. मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर आपले फोटो, नावाची आद्याक्षरे लावत आहेत. राजस्थानच्या 007 गॅंगची वाटचाल अशीच सुरू होती. कोल्हापूरात त्याच प्रवृत्तीनी मुळ धरू नये म्हणून त्यांना आत्ताच ठेचण्याची गरज आहे. 

हे पण वाचा -  शब्बास... कोल्हापूर पोलिस, मुंबईत होणार सत्कार...