जोतिबा डोंगर आज एक लाख भाविकांनी फुलला ; वयोवृध्दांसह बालकांचीही हजेरी

1 lakh visitors visit in jotiba in kolhapur today
1 lakh visitors visit in jotiba in kolhapur today
Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शनसाठी आज दिवसभरात राज्यभरातून सुमारे एक लाख भाविकांनी डोंगरावर गर्दी केली. त्यामुळे डोंगराला खेट्याचे स्वरूप प्राप्त झाले. रविवार असल्याने पहाटेपासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात गर्दी असुनही लहान मुलांसह, वयोवृद्धांनीही दर्शनासाठी हजेरी लावली होती. 

भर उन्हात ठाकरे मिटके गल्लीतून दर्शन रांग गज गतीने मंदिराकडे येत होती. कामधेनू गाय जवळ असणाऱ्या दरवाजातून भाविकांना सोडण्यात येत होते, तर दक्षिण दरवाजातून बाहेर येण्याचा मार्ग होता. गर्दीमुळे रांगेतून भाविकांनी दर्शन घेतले पण लहान बालके आणि वयोवृध्दांना कळस दर्शनावरच समाधान मानावे लागले. नियम व अटीनूसार भाविकांना दर्शनाचा लाभ घेतला.

भाविक मुख्य मंदिरात जाताना मास्क, सॅनिटायझर लावून जात होते, पण मंदिराच्या बाहेर मात्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसत होता. दीड महिन्यापासून डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. त्याप्रमाणे आज दिवसभरही भाविकांची रेलचेल पाहायला मिळाली. मंदीरात आज सकाळी पाद्य पूजा, काकड आरती, मुख मार्जन या विधीनंतर मंगलपाठ झाले. त्यानंतर सकाळी जोतिबा देवाची सांलकृत महापूजा बांधण्यात आली. मंदिर परिसरात कोडोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त होता.

"सर्रास लहान मूले वयोवृध्द हे दर्शन रांगेतून मुख्य मंदिर परिसरात उन्हामुळे घामाने चिंब होऊन येत होते. पण त्यांना दर्शनासाठी मंदिरात सोडत नसल्याने ते निराश झाले. त्यांना केवळ शिखराचे दर्शन घ्यावे लागले."

- अमर पाटील, भाविक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com