कोल्हापुरात निर्भया पथकांची गस्त वाढणार ; '१०९१' नंबरवर करा संपर्क

1091 is helpline number for women in kolhapur nirbhaya team also increased in kolhapur
1091 is helpline number for women in kolhapur nirbhaya team also increased in kolhapur
Updated on

कोल्हापूर : महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस दल सरसावले आहे. महिला अत्याचार, छेडछाडी संदर्भातील येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन सुरक्षेसंदर्भातील आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. निर्भया पथकांची गस्त वाढवून हेल्पलाईन क्रमांकाबाबत प्रबोधनाची मोहीम हाती घेतली 
जाणार आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलवडे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी महिला अत्याचाराबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घ्या. संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लास, सिनेमागृहे बंद आहेत; पण ते सुरू झाल्यानंतर येथे गस्त घालण्याचे आदेश निर्भया पथकाला दिले आहेत.

स्थानिक पोलिस ठाण्यांनाही साध्या गणवेशातील पथकाची गस्त या ठिकाणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हेल्पलाईनवर सध्या छेडछाडीसंबंधी तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे; पण पतीने दारू पिऊन मारहाण केली. मुलीला सासरी छळ होतोय, लॉकडाउनमुळे तिच्याकडे जाता येत नाही. तिला संरक्षण द्या, अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. आवश्‍यक ती कारवाई महिला तक्रार निवारण कक्षाकडून करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी हेल्पलाईनचा वापर करून तक्रारीसाठी पुढे यावे.

१०९१ वर मागा मदत

रात्रीच्या वेळेस एखाद्या महिलेला घरी जाताना असुरक्षित अगर भीती वाटत असेल, तर अशावेळी त्यांनी १०९१ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. पोलिसांच्या वाहनातून तिला सुरक्षित घरी पोहचविण्याची व्यवस्था केली जाते. 

छेडछाडीची येथे करा तक्रार

- हेल्पलाईन - १०९१ व १०० 
- शहर विभाग - ९४०५३८०१३३
- करवीर विभाग - ९४०४१९०१३३
- इचलकरंजी विभाग - ९४०५३५०१३३
- जयसिंगपूर विभाग - ९४०५०१६१३३
- गडहिंग्लज विभाग - ९४०४९१२१३३
- शाहूवाडी विभाग - ९४०३९५६०३३

"अत्याचार, छेडछाडीबाबत महिलांनी निर्भीडपणे तक्रार देण्यासाठी पुढे यावे. हेल्पलाईन अगर स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. यासह निनावी तक्रारींचीही दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल."

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com