esakal | एसटीचे 120 कर्मचारी नेमणूकीच्या प्रतिक्षेत

बोलून बातमी शोधा

120 Employees Of ST Await Appointment Kolhapur Marathi News

दोन वर्षांच्या अथक मेहनतीमुळे एसटी महामंडळात वाहक-चालक म्हणून गतवर्षी निवड झाली. नोकरीचे स्वप्न साकार होणार म्हणून जिद्दीने मन लावून प्रशिक्षणात सहभाग घेतला. पण, प्रशिक्षण पुर्ण होण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असतानाच लॉकडाउन झाले.

एसटीचे 120 कर्मचारी नेमणूकीच्या प्रतिक्षेत
sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : दोन वर्षांच्या अथक मेहनतीमुळे एसटी महामंडळात वाहक-चालक म्हणून गतवर्षी निवड झाली. नोकरीचे स्वप्न साकार होणार म्हणून जिद्दीने मन लावून प्रशिक्षणात सहभाग घेतला. पण, प्रशिक्षण पुर्ण होण्यास केवळ तीन दिवस शिल्लक असतानाच लॉकडाउन झाले. त्यामुळे दुर्देवाने हाता-तोंडाशी आलेला नोकरीचा घास हिरावला. यंदा पुन्हा नव्या उमेदीने पंधरा दिवसांचे उजळणी प्रशिक्षण पुर्ण केले. मात्र, कोल्हापूर विभागातील अद्यापही या 120 जणांना नियुक्तीपत्रे देऊन हजर करून घेतलेले नाही. त्यातच पुन्हा कडक लॉकडाउनचे संकेत असल्याने या वाहक-चालकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

दोन वर्षापुर्वी राज्यभरात महामंडळाने चालक-वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. राज्यात सुमारे 3500 तर, कोल्हापूर विभागात 383 जागा होत्या. त्यात पहिल्यांदा लेखी परीक्षा झाली. त्यातील उत्तीर्ण युवकांची बस चालवण्याची चाचणी झाली. त्यानंतर वैद्यकिय तपासणीतून 250 युवक पात्र ठरले. रूजू होण्यापुर्वी एसटी महामंडळात प्रशिक्षण दिले जाते. अवजड वाहन परवाना तीन वर्षे पूर्ण असलेल्यांना 48 तर, हा कालावधी पुर्ण नसऱ्यांना 84 दिवस प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार या युवकांची प्रत्येक गटात 30 या प्रमाणे विभागणी करून प्रशिक्षण झाले. 

प्रशिक्षण पुर्ण होण्यास अवघे तीन दिवस असताना लॉकडाऊन सुरु झाल्याने गेल्यावर्षी नियुक्तीची सर्वच प्रक्रिया खोळबंली. प्रशिक्षणानंतर मोठा खंड पडल्यामुळे निवड झालेल्या युवकांना फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पुन्हा 15 दिवस उजळणी प्रशिक्षण पुर्ण करावे लागले. प्रशिक्षण पुर्ण होऊन आता महिना झाला तरी नियुक्ती पत्रे आणि हजर करुन घेण्यासाठी कोणत्याच हालचाली नाहीत. त्यामुळे प्रशिक्षण पुर्ण झालेल्या युवकांचा जीव टांगणीला लागला आहे. एसटी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करुन हजर करुन घ्यावे, अशी या युवकांची मागणी आहे. 

पालकांना घोर 
मुळातच दिवसेंदिवस वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांसह त्यांचे कुटूबिंय तणावाखाली आहेत. प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्यात कोरोनामुळे नियुक्तीने हुलकावणी दिली. आता परत उजळणी प्रशिक्षण पुर्ण होऊनही नियुक्तीपत्रे आणि सेवेत हजर करुन घेण्यासाठी विलंब होऊ लागल्याने युवकांच्या कुटूंबियांना घोर लागला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur