बेळगाव ब्रेकिंग - राज्यात पावणे दोनशे जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

राज्यात नव्या 178 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने आकडा 2 हजार 711 वर पोचला आहे. त्यापैकी 35 जणांना 24 तासात डिस्चार्ज दिला.

बेळगाव - राज्यात 24 तासात 27 बालके आणि हायरिस्क म्हणजे 55 वर्षाहून अधिक पाच जणांना कोरोना लागण झाल्याचे निदान झाले आहे. राज्यात नव्या 178 जणांना आज दुपारपर्यंत कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बालक, वयोवृध्द मिळून 32 जणांना संसर्ग झाला आहे. 

राज्यात नव्या 178 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने आकडा 2 हजार 711 वर पोचला आहे. त्यापैकी 35 जणांना 24 तासात डिस्चार्ज दिला. एकूण डिस्चार्ज सख्या 869 झाली. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 93 इतकी आहे. 47 जणांचा मृत्यू झाला आहे. पैकी आज (ता.29) आलेल्या नवीन आकडेवारीने कहर केला. तब्बल 178 जणांना बाधा झाली असून, त्यामध्ये 27 बालकांचा समावेश आहे. मुलांचे 2 ते 15 वर्षे या दरम्यान वय आहे. दुसरीकडे 50 हून अधिक वय असलेल्या 5 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले.

दहापेक्षा कमी आणि 55 हून अधिक वयाच्या व्यक्तींनी लॉकडाऊन संदर्भात बाहेर पडू नये, असे निर्देश आहेत. मात्र, त्यानंतरही नियमाचे पालन केले जात नाही. काही संदर्भात मुले पालकांसह घराबाहेर पडणे, प्रवास करणे घडते. त्यातून कोरोना संसर्ग होऊन मुलांची फरफटत सुरु आहे. ह

हे पण वाचा - अख्ख्या जगाच्या उरात धडकी भरविणारी टोळधाड नक्की आहे तरी काय?

महाराष्ट्राहून उडपीला आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांचे अनुक्रमे वय 6, 7, 10 इतके आहे. यादगिरीला महाराष्ट्राहून आलेल्या 10, 13 व 15 वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह झाले. दावणगेरी 8, बंगळूर शहर 3 वर्षाच्या बालकाला कोरोना झाल्याचे निदान झाले. गुलबर्ग्यात 8, 6, 12 वर्षाच्या बालकांना कोरोना झाला आहे. रायचूरला 7, 9, 11, 8, 15, 12, 13, 15 आणि यादगिरीतील 2, 3, 8, 5, 14, 8, 3, 8 वयाच्या बालकांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. तसेच वयोवृध्द म्हणजे 55 हून अधिक वय असलेल्या पाच जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यांचे अनुक्रमे वय 63, 80 (दोघे उडपी), 55 (यादगिरी), 68 , 68 (दोघे दावणगेरी) इतके आहे.

हे पण वाचा -  अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 178 new corona positive case in karnataka