अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा ; संभाजी राजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

संभाजी राजे यांनी आपल्या पोस्टमधून पोलिसांनाही सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर - अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला असल्याचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे.  

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नर तालुक्‍यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे मारहाणीचे आरोप केले हाेते. त्यानंतर साेशल मिडियातून अक्षयचे लाईव्ह माेठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. समाजमाध्यमातूनही या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. खा. संभाजी राजे यांनी आपल्या फेसबुकवरून अक्षयला झालेल्या मारहाणीचा निषेध करत त्याच्यापाठीमागे ठाम उभा असल्याची ग्वाही दिली आहे.  

काय आहे संभाजी राजेंची फेसबुक पोस्ट?
संभाजी राजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवमध्ये म्हटले आहे की, अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. अशा प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे.

हे पण वाचा - अख्ख्या जगाच्या उरात धडकी भरविणारी टोळधाड नक्की आहे तरी काय?

पोलिसांना सूचना 
संभाजी राजे यांनी आपल्या पोस्टमधून पोलिसांनाही सूचना दिल्या आहेत. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपीला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? अक्षय बोऱ्हाडेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो. असे संभाजी राजेंनी म्हटले आहे. 

हे पण वाचा -  त्या चिमुरडीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली पण...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji raje chhatrapati Facebook post on akshay borade Beating case