ब्रेकिंग - कोल्हापुरात विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाइन शिक्षण तिला जमत नव्हते.

कोल्हापूर - ऑनलाईन शिकवणी समजत नसल्याने वाशी तालुका करवीर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐश्वर्या पाटील (वय 20) असे तिचे नाव आहे. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाइन शिक्षण तिला जमत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ती अस्वस्थ व निराश होती. याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास  घेतला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला,अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली. 

हे पण वाचाVideo - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 year old student suicide in kolhapur