Big Breaking;कोल्हापुरात कोरोनाचा धडाका सुरूच ;सायंकाळपर्यंतच दोनशे पार 

200 corona cases cross in today at kolhapur district
200 corona cases cross in today at kolhapur district
Updated on

कोल्हापूर - आजही जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. दुपारपर्यंत ५५ रूग्णांची नोंद झाल्यानंतर आता आणखी  तब्बल १२८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता १७४७ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. इचलकरंजीतही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तेथे आज दुपारपर्यंत कोरोनाच्या रूग्णांनी दोनशेचा अकडा ओलांडला असतानाच आता आणखी ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.  


आता पाॅझिटिव्ह आलेल्यांध्ये सर्वाधिक संख्या हातकणंगले येथील आहे. आता आलेल्या अहवालानुसार इचलकरंचीत नव्या ३२ रूग्णांची भर पडली आहे तर शाहुवाडी अकरा, करवीर तेवीस, कोल्हापूर शहर एक, गडहिंग्लज पाच, हातकणंगले ५४ जणांचा समावेश आहे. शिवाच दुपारी पाॅझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये पन्हाळा बारा, करवीर नऊ, चंदगड चोवीस, कोल्हापूर शहर पाच तर इचलकरंजीतील चार जणांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त चंदगड तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. 


शियेत आणखी तीन पॉझिटिव्ह ; पाच दिवस गावबंदचा निर्णय  

शिये ( ता. करवीर  ) येथे कोरोनाचा कहर सुरूच असून आज दुपारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातील बाधितांची संख्या आठ झाली आहे. त्यामुळे पाच दिवस गावात कडकडीत बंद ठेवला आहे. रविवारी रात्री रामनगर येथील युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या चौदा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या पार्श्वभूमीवर 
सरपंच रणजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली गावातील प्रमुख पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यात चर्चा होऊन गावबंदच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये रामनगर येथे राहणारे त्या युवकाचे वडिल व चुलत बहीण आणि गाव भागातील चुलत बहीण यांचा समावेश आहे. 

दरम्यान गावात समूह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने सरपंच रणजीत कदम यांनी तातडीची बैठक बोलावली. यामध्ये दुध संकलन  व औषध वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहिर करण्यात आले. यामध्ये सकाळी सहा ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दुध व शेतीच्या कामासाठी शितीलता राहणार आहे. अंत्यविधी व रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी वीस पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यानी स्वयंस्फुर्तीने आपली तपासणी करून घ्यावी.असे आवहान सरपंच रणजित कदम यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, उपसरपंच माधुरी शिंदे, पांडुरंग पाटील, विलास जाधव, जयसिंग काशीद, पोलीस पाटील मनिषा सिसाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.शोभा सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी के.बी.पाटील, तलाठी केसरकर, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com