कोल्हापुरात दिवसभरात नवे 22 कोरोनाबाधित रूग्णांची भर  

शिवाजी यादव 
Friday, 4 December 2020

गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात एकूण 65 व्यक्ती गंभीर अवस्थेत होत्या

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 22 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत तर 41 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. सीपीआर रूग्णालयात 7 गंभीर रूग्णांवर तर खासगी रूग्णालयात सहा गंभीर बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात एकूण 65 व्यक्ती गंभीर अवस्थेत होत्या. त्यातील 40 हून अधिक व्यक्तीचा धोक्‍यातून बाहेर आल्या आहेत. त्यांच्यावर जनरल वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत. अशात जिल्हाभरातील 14 कोवीड सेंटरवर 125 जनांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्याचे अहवाल लवकरच उपलब्ध होतील. 
तर शासकीय व खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या गंभीर अवस्थेतील बाधितांना हृदयविकार, फुप्फुसातील संसर्ग, न्युमोनिया अशी लक्षणे आहेत. तर जिल्हाभरातील सर्व कोवीड सेंटरवर मिळून 288 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या कमी झालेली असली तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्यापि कमी झालेला नाही. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे अशी अपेक्षा शासकीय डॉक्‍टरांकडून व्यक्त होत आहे. 

हे पण वाचाशिक्षक, पदवीधरच्या निकालाने चंद्रकांतदादांना सणसणीत चपराक  

 
एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 132 
कोरोना मुक्त ः 47 हजार 157 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 687 
उपचार घेणारे ः 288 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 news corona patient in kolhapur