नोकरीचे अमिष दाखवून केली तीन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

नोकरीच्या अमिषाने तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला.

कोल्हापूर : नोकरीच्या अमिषाने तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. विजय बडे व भाग्यश्री विजय बडे (दोघे रा. नालासोपारा, वेस्ट मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. 

हेही वाचा - कोल्हापुरकरांनी केली बंगळूरच्या माय-लेकींची सुखरूप पाठवणी

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अभिजित राजाराम माने (वय 34) हे येळावी (ता. तासगाव, सांगली) येथे राहतात. त्यांच्या मेहुण्याला नोकरीची गरज होती. दोन वर्षापूर्वी त्यांच्या संपर्कात संशयित विजय व भाग्यश्री बडे हे दोघे आले. त्या दोघांनी मेहुण्याला नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्याला ते बळी पडले. त्यांनी 2 जुलै 2018 ते 8 ऑगस्ट 2018 या काळात वेळोवेळी तीन लाख एक हजाराची रक्कम त्या दोघांना दिली. पण त्या दोघांनी मेहुण्याला नोकरी लावली नाही. 

म्हणून माने यांनी त्या दोघांकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्या दोघांनी बॅंक खात्यावर पैसे नाही हे माहित असतानाही 1 लाख 32 हजारांचा धनादेश दिला. पुन्हा पैशाची मागणी केल्यावर त्या दोघांनी आपल्यावरच गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली असे यांनी फिर्यादेत म्हटले आहे. हा गुन्हा वर्ग होऊन लक्ष्मीपुरी पोलिसात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा - शाळा दत्तक घेतल्या, पुढे काय? 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 lakh rupees fraud related to recruitment for job in kolhapur