राखीव कमांडो फोर्स, जलदकृती दलासह मतदानासाठी पोलिसांची 36 भरारी पथके सज्ज

सुनील पाटील 
Monday, 30 November 2020

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा जाहीर प्रचार काल सायंकाळी संपला

कोल्हापूर - पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक उद्या (ता.1) होत असून कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची 36 भरारी पथके नजर ठेवून असणार आहेत. जिल्ह्यात एकूण 281 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर तीन ते पाच पोलिस असणार आहेत. शिवाय तीन राखीव कमांडो फोर्स (आरसीपी) आणि तीन जलदकृती दलाची पथके (क्‍युआरटी) सुद्धा सज्ज असणार आहेत. 

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा जाहीर प्रचार काल सायंकाळी संपला. त्यानंतर प्रत्येक केंद्रावर पोलिसांची नियुक्ती केली आहे. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुकानिहाय नियोजन पोलिस अधीक्षकांकडून केले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्‍यासाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बारा तालुक्‍यातील एकूण36 पथकांचे लक्ष जिल्ह्यातील निवडणुकीतील अनुचित प्रकारावर असणार आहे. सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालक्‍यासाठी पोलिसांची तीन अशी भरारी पथके आहेत. 

हे पण वाचाआयुष्यभर आईच्या पदराला धरुन राहिला, जीवनाचा शेवटही आईसोबतच झाला ; माय-लेकरावर काळाचा घाला 
 
असा आहे बंदोबस्त... 
एक पोलीस अधीक्षक, 
दोन अप्पर पोलीस अधीक्षक 
पाच पोलीस उपअधीक्षक, 
18 पोलीस निरीक्षक, 
42 सहायक पोलीस निरीक्षक 
604 पोलीस अंमलदार 
तीन रिझर्व्ह कमांडो फोर्स (आरसीपी), 
तीन जलदकृती दल पथके (क्‍यआरटी)  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 brigades of police for polling along with Reserve Commando Force Rapid Action Force