Covid Update : कोल्हापुरात चार दिवसापासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट

शिवाजी यादव
Wednesday, 23 September 2020

दिवसभरात 9 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 14 झाली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 360 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 130 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 40 हजार 880 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 29 हजार 595 झाली आहे. तर दिवसभरात 9 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 14 झाली आहे. त्यामुळे कोरोनाची भिती कायम आहे. 

हेही वाचा - कोल्हापुरातील स्मिथीया फुलांचं मसाई पठार खुणावतेय पर्यटकांना
 

गेल्या चार दिवसात एकूण 332 व्यक्ती गंभीर सापडल्या आहेत. त्यापैकी सीपीआरमध्ये 282 आयजीएममध्ये 20 तर गडहिंग्लजमध्ये 9 तर उर्वरीत खासगी रूग्णालयात 30 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या घटत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या लक्षवेधी असल्याने ग्रामीण भागातही दिलासा मिळत आहेत. यात इचलकरंजी, करवीर, कोल्हापूर शहर, आजरा, चंदगड येथे नवे कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण किमान 10 ते 70 या संख्येने कमी झाले आहे. 

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद : कोल्हापुरात गोलमेज परिषदेत निर्णय 

गेल्या दहा दिवसा पूर्वी यात भागात सर्वाधिक संख्येने कोरोनाबाधित आढळत होते, यातही दाटीवाटीच्या भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठी होती, त्यामुळे भितीचे वातावरण होते. सद्या बाधितांची संख्या कमी होत असल्याने या भागात काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान जिल्ह्यातील 14 शासकीय रूग्णालयात दिवसभरात जवळपास 1 हजार 204 व्यक्तींचे स्वॅब घेतले आहेत. जिल्ह्यातील 79 कोवीड सेंटरवरील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत सर्व गंभीर बाधितांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. अशात कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने विविध कोवीड सेंटरवर बेड उपलब्ध होत आहेत. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 360 corona patients are fights today in kolhapur but 130 people positive today