esakal | 387 विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होऊन तीन वर्षे "पीएसआय'ची वर्दी नाहीच !
sakal

बोलून बातमी शोधा

387 students have passed the exam and no PSI uniform for three years!

कोल्हापूर ः पोलिस उपनिरीक्षक अर्थात फौजदार होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. परीक्षा झाली. शारीरिक चाचणी झाली. मुलाखत सुद्धा झाली. तीन वर्षे होत आले तरीही ट्रेनिंगसाठी बोलावले नाही. आज, उद्या बोलावतील या प्रतिक्षेत राज्यातील 387 विद्यार्थी आहेत. यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या भावी करीअरची चिंता सतावत आहे. 

387 विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होऊन तीन वर्षे "पीएसआय'ची वर्दी नाहीच !

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः पोलिस उपनिरीक्षक अर्थात फौजदार होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. परीक्षा झाली. शारीरिक चाचणी झाली. मुलाखत सुद्धा झाली. तीन वर्षे होत आले तरीही ट्रेनिंगसाठी बोलावले नाही. आज, उद्या बोलावतील या प्रतिक्षेत राज्यातील 387 विद्यार्थी आहेत. यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या भावी करीअरची चिंता सतावत आहे. 

विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन काळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जोर धरतो. साधारण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळते. साधारण 25-26 वर्षापर्यंत विद्यार्थी "पीएसआय'ची परीक्षा उत्तीर्ण होतात. यानंतर एक-दीड वर्षात सर्व प्रक्रीया पूर्ण करून त्यांना प्रत्यक्षात वर्दी घालून फिल्डवर येता येईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र या प्रक्रियेची दिरंगाई अधिक होत आहे. केवळ प्रक्रीयेसाठी दिरंगाई होत असल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या करीअरचा आलेख चुकत असल्याच्या भावना विद्यार्थीनींच्या आहेत. अनेकांनी लग्न केलेले नाही, तर काहींना भाविष्याचे नियोजन सतावत आहे. परीक्षेसाठी दोन-तीन वर्षे आणि यश मिळाल्यानंतर पुन्हा तीनवर्षे थांबून सुद्धा वर्दी अंगावर चढविता येत नसल्याने नाराजी वाढत आहे. तातडीने त्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून त्यांना नियुक्ती मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडून पुढे येत आहे. 
-------------- 
अशी आहे प्रतिक्षा 
-पोलिस सब इन्स्पॅक्‍टर (पीएसआय) या पदासाठी जाहिरात - 2018, -एकूण जागा - 387, 
- पूर्व परीक्षा - 13 मे 2018, -मुख्य परीक्षा -26 ऑगस्ट 2018 व 2 सप्टेंबर 2018, -शारीरिक चाचणी व मुलाखत - जानेवारी 2020( मुख्य परीक्षेनंतर तब्बल14 महिन्यांनी ),-निकाल घोषणा - 17 मार्च 2020, -शिफारसपत्र - 21 जुलै 2020,- यापुढील प्रक्रिया ठप्प आहे, मेडिकल व चारित्र्य पडताळणी पेंडीग आहे 
 

प्रशिक्षणालाही विलंब 
गेले काही वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले खात्याअंतर्गत निवड झालेले 636 उमेदवारांचे मेडिकल नुकतेच झाले आहे. त्यांचे ट्रेनिंग आधी की 2018 च्या बॅचचे आधी याबाबत संभ्रमावस्था असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. 2017 च्या बॅचचे ट्रेनिंग 7 जानेवारी2020 रोजी सुरु झाले आहे. त्यांचे 11 महिने 7 डिसेंबरला संपत आहेत. कोरोना महामारीमुळे ही दिरंगाई झाला आहे. ही बॅच साधारण जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये पूर्णक्षमतेने बाहेर पडेल, त्यानंतर याबॅच मधील विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग होईल, असा अंदाज विश्‍वसनीय सुत्रांचा आहे. 
 

मुलींनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून भरपूर प्रयत्नांतून यश मिळविले, पण त्यांना वर्दी अंगवार परिधान करण्यासाठी तीन वर्षोचा कालावधी गेला आहे. यातून मुलींच्या भविष्याचे नियोजन कोलमडत आहे. तातडीने प्रक्रीया पूर्ण करून आम्हाला पोस्टींग मिळावे, हीच आमची इच्छा आहे. 
पद्मजा पाटील (पणुत्रे जि.कोल्हापूर)