4 हजारावर क्‍युसेक विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधील पाण्यासाठी योग्य पातळीनुसार ठेवला जात आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कुंभी व कडवी धरणातून व जलाशयातून 4 हजार 225 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

 

कोल्हापूर : मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांमधील पाण्यासाठी योग्य पातळीनुसार ठेवला जात आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कुंभी व कडवी धरणातून व जलाशयातून 4 हजार 225 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

केरळमध्ये 1 जून आणि सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यात 9 ते 12 जून दरम्यान, मॉन्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीतील पाणी पातळीत वाढ होणार आहे. काल दुपारपासून विसर्ग सुरू आहे. गेल्यावर्षी सर्वच धरणातील पाणीसाठा कमी होता, तरीही अतिवृष्टीमुळे धरणे नियोजित वेळेपेक्षा वीस ते पंचवीस दिवस आधीच भरून वाहू लागली. 

धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग आणि यातच अतिवृष्टी होत राहिल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यावर्षी आपत्ती व्यवस्थापनासह धरणातील पाण्याचेही सक्षम नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी याच दिवसात राधानगरी धरणातील पाणी पातळी 571.35 मीटर होती. आज 572 मीटर आहे. याशिवाय दूधगंगाची पाणी पातळी 615 होती आता 526 आहे. दरम्यान, ही पाणी पातळी कमी करण्यासाठी नियोजन केले आहे. मॉन्सून सुरू झाल्यानंतर धरणातील आणि नदीतील पाणी वाढू नये यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 

धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन केले असून आवश्‍यक विसर्गही सुरू केला आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळी वाढू शकते. 
- रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 thousand cusec visarga