कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 5671 अहवाल प्रलंबित

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 5671 अहवाल प्रलंबित

कोल्हापूर ः जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत अलगीकरण कक्षात असलेल्या 5671 जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक 1316 जण गडहिंग्लज तालुक्‍यातील असून, प्रलंबित अहवालाच्या तुलनेत तपासणीचा वेग कमी असल्याने ही संख्या वाढली आहे. 
दरम्यान, कोल्हापूर शहरात विविध हॉटेल्स व इतर संस्थांत ठेवलेल्या सुमारे हजारभर जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या 5671 वर पोहचली आहे. 
पंधरा दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतून किंवा परराज्यातून आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. या स्वॅबचे अहवाल येईपर्यंत सर्वांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतांशी जण हॉटेलमध्ये स्वखर्चाने राहिले आहेत. तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर संबंधितांना होम क्‍वारंटाईनचा शिक्का मारून व घरी राहाण्याचे हमीपत्र घेऊन सोडण्यात येते. 
जिल्ह्यात 1 मेपासून आजअखेर तब्बल 34 हजार 878 जण विविध जिल्ह्यांतून किंवा राज्यातून आले आहेत. यापैकी 15 हजार 330 जणांना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर 19 हजार 548 जणांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अलगीकरण केलेल्यांपैकी आतापर्यंत 178 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अलगीकरण कक्षात ठेवलेल्यांपैकी 4169 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. बारा तालुक्‍यांत 1474 अलगीकरण केलेल्या संस्था आहेत. 


तालुकानिहाय प्रलंबित अहवाल 
आजरा- 182, भुदरगड - 496, चंदगड- 945, गडहिंग्लज- 1316, गगनबावडा- 51, हातकणंगले- 104, करवीर- 59, कागल - 484, पन्हाळा - 180, राधानगरी- 912, शाहूवाडी - 709, शिरोळ - 234. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com