कोल्हापूर जिल्ह्यातील 6 मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

जिल्ह्यातील दोन राज्य व चार प्रमुख जिल्हा मार्ग बंद केले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली

कोल्हापूर  : जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत, तर कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर २७.२ फूट पाणी आहे. राधानगरी धरणाच्या एकूण ८.३६ टीएमसीपैकी ३.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून १४०० क्‍युसेक पाण्याचा विर्सग सुरू केला आहे. जिल्ह्यातील दोन राज्य व चार प्रमुख जिल्हा मार्ग बंद केले असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
 

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. 
चंदगड तालुक्यातील कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्य हद्द रा.मा.क्र. 189 मार्गावर कि.मी.135/200 चंदगड पुलावर 1.5 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून रा.मा.क्र. 180 ते पाटणे फाटा मोटणवाडी फाटा प्रजिमा क्र. 76 ते रा.मा.क्र. 189 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

आजरा तालुक्यातील प्रजिमा 52 पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राम क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून इजिमा 139 सोहाळे मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.
कागल तालुक्यातील सोनाळी सावर्डे बु. सावर्डे खु. केनवडे,गोरंबे, आनुर, बस्तवडे प्रजिमा क्र. 46 मार्गावर बस्तवडे बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून राज्यमार्ग 195 निढोरी मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे हलकर्णी प्रजिमा क्र. 71 मार्गावर करंजगाव पुलावर 1 फुट पाणी आल्याने वाहतुक बंद असून पाटणे फाटा मोटणवाडी रा.मा. 189 मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे.

हे पण वाचा - टोप मधील 'तो' ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक कोरोना पाॅझिटीव्ह... -

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नुल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावर निलजी बंधाऱ्यावर 6 इंच पाणी आल्याने व नंदनवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतुक बंद असून प्रजिमा 80 वरून दुंडगे-जरळी-मुंगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 routes closed in Kolhapur district