...आणि त्यांच्या चेहऱ्यावर  समाधानाचे भाव उमटले 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 January 2020

सर्वत्र देशाचा 71 वा प्रजासत्ताकदिन विविध उफक्रमांनी झाला. खेळ, स्पर्धा, बक्षीस वितरण, गीतगायन आदी उपक्रम राबविले. असाच एक उपक्रम पहिल्यांदाच कुंभारवाडी(ता. पन्हाळा) या छोट्याशा वाडीत राबविण्यात आला. सरपंचांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाला ग्रामस्थांनीही सलाम केला.

पुनाळ- सर्वत्र देशाचा 71 वा प्रजासत्ताकदिन विविध उफक्रमांनी झाला. खेळ, स्पर्धा, बक्षीस वितरण, गीतगायन आदी उपक्रम राबविले. असाच एक उपक्रम पहिल्यांदाच कुंभारवाडी(ता. पन्हाळा) या छोट्याशा वाडीत राबविण्यात आला. सरपंचांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाला ग्रामस्थांनीही सलाम केला.

हे पण वाचा - १९९९ नंतर का बिघडली सेनेची नियत....? वाचा...

ग्रामपंचायातीचे ध्वजवंदन सरपंच ,उपसरपंच तर काही वेळा सदस्य, ग्रामसेवक करतात; पण इतर कोणत्याही व्यक्तीला सहसा ध्वजवंदनाचा मान मिळत नाही. त्यास आचारसंहिता अपवाद असू शकतो. कुंभारवाडी हे अवघ्या सातशे लोकवस्तीचे गाव. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरपंच म्हणून महेश महादेव साळोखे निवडून आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन करायचे होते; पण सरपंच महेश साळोखे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी आपला ध्वजवंदनाचा मान तेथे उपस्थित असणाऱ्या गावातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती बाबू कर्ले या 90 वर्षीय आजोबांना दिला. आजोबांच्या संपुर्ण आयुष्याच्या प्रवासात पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवायला मिळाल्याने त्यांचा चेहरा आनंदाने भरून गेला. आजोबांचा आनंदी चेहरा पाहून सरपंचांसह सर्वजण आनंदून गेले. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90 year old citizen flagging in kolhapur