
मुरगूड (कोल्हापूर) : मळगे खुर्द ते मळगे बुद्रुक मार्गावर अस्वलेच्या विहिरीलगतच्या ओढ्यात भरधाव ट्रॅक्टर (एमएच ०९ सीजे ४४९६) कोसळून तरुण ठार झाला. ही घटना काल दुपारी घडली. सत्यजित दत्तात्रय पाटील (वय २३, रा. मळगे खुर्द) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : मळगे खुर्द येथील सत्यजित दत्तात्रय पाटील आज दुपारी ट्रॅक्टर घेऊन भरधाव मळगे खुर्द ते मळगे बुद्रुक दरम्यानच्या मार्गावरून जात होता. या मार्गावर अस्वलेच्या विहिरीलगत असणाऱ्या ओढ्यात ट्रॅक्टर कोसळला. ट्रॅक्टरखाली सत्यजित सापडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले; पण उचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची फिर्याद भाऊ सचिन दत्तात्रय पाटील यांनी मुरगूड पोलिसांत दिली आहे.
असाच अपघात...
काल झालेल्या अपघातातील मृत तरुण सत्यजित याचे वडील दत्तात्रय पाटील यांचा सहा वर्षांपूर्वी मुरगूड-निपाणी मार्गावर यमगेच्या कुंभार गेटजवळील ओढ्यात ट्रॅक्टर पडून मृत्यू झाला होता.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.