कोल्हापूर : रंकाळ्यावर भरधाव चार चाकीने दुचाकींना उडवले, दोनजण जखमी

accident in kolhapur rankala lake town injured in this accident
accident in kolhapur rankala lake town injured in this accident

कोल्हापूर : रंकाळा येथील शिवाजी मराठा हायस्कूल जवळ भरधाव आलेल्या चार चाकीने तेथे उभ्या असणाऱ्या दुचाकींना उडवले. एका खाद्य पदार्थाच्या गाडीला चार चाकीने धडक दिली. यामध्ये सहा ते आठ दुचाकींचे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर लगेचच आसपासचे लोक गाळा झाले. यामध्ये स्थानिक तरुणही होते. चिडलेल्या जमावाने चारचाकी फोडली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी अग्नीशमनदल आणि पोलिस आले. त्यांनी जमावाला पांगवले. जमाव जमल्याने परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या अपघाताबद्दल घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रंकाळा टॉवरच्या दिशेने एक चार चाकी भरधाव वेगाने आली. रंकाळ्या तलावाच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ ही चार चाकी रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावरून खाली उतरली. तेथे लावलेल्या सहा ते आठ दुचाकी गाड्या उडवल्या. शिवाजी मराठा हायस्कूल जवळ एक खाद्यपदार्थाची हातगाडी उभी होती. त्याला ही चार चाकी धडकली आणि थांबली. यामध्ये दोन जण जखमी झाले. 
अचानक घडलेल्या या थरारामुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले.

तात्काळ तेथे स्थानिक तरुण आणि नागरिकांचा जमाव जमला. त्यांनी चालकाला गाडीतून बाहेर काढले. संतप्त जमावाने चार चाकी फोडली. काही नागरिकांनी चालकाला जमावातून बाहेर आणले. घटनेची माहिती काही जणांनी पोलिसांनी दिली. लगचेच जूना राजवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली. त्यांनी जखमींना रुग्णवाहीकेतून खासगी दवाखान्यात दाखल केले. जशी घटनेची माहिती मिळाली तशी गर्दी आणखी वाढू लागली. अखेर पोलिसांनी जमाव पांगवला. या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

तरुणांचे दोन गट आमने-सामने

चालक हा याच परिसरातील असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे चालकाचे मित्रही तेथे जमले. ज्यांचे नुकसान झाले ते तरुण आणि चालकाच्या मदतीसाठी आलेल्या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. मात्र स्थानिकांनी हा वाद जागीच मिटवून तरुणांना तेथून बाजूला नेले. या संपूर्ण घटनेने रंकाळा परिसरात तणाव निर्माण झाला होता.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com