'देव तारी त्याला कोण मारी' ; दुचाकी - ट्रकचा झाला अपघात अन् साडीनेच वाचवला तिचा जीव

accident of truck and two wheeler in sangli but no injury in case of accident
accident of truck and two wheeler in sangli but no injury in case of accident

नेर्ले (सांगली) : आशियायी महामार्गावर दुचाकीच्या अपघातात ट्रकच्या खाली पडून जॉईंटला साडी अडकल्याने महिलेला जीवनदान मिळाले. काल दुपारी एकच्या सुमारास अंगावर शहारे आणणारा हा विचित्र अपघात घडला. 'देव तारी त्याला कोण मारी' ही असा प्रसंग घडला. मालट्रकने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने वडगाव हवेली येथील पोपट रामचंद्र सुतार (वय 60) हे दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. तर पाठीमागे बसलेली ती महिला सुदैवानं वाचली. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडगाव हवेली (जिल्हा कोल्हापूर )येथील पोपट रामचंद्र सुतार व त्यांची सून पल्लवी अविनाश सुतार (वय 31) कऱ्हाडकडून नेर्ले मार्गे इचलकरंजी ला पाहुण्यांकडे दुचाकी (क्र. एम. एच. 11 क्‍यू 2267) या मोटारसायकलवरून चालले होते.

कोल्हापूर दिशेला लाकूड भरून चाललेला मालट्रक (एम एच 05 एम 3184) याने पाठीमागून सुतार यांची मोटारसायकल व ट्रॅक्‍टरला ओव्हर टेक करत असताना पाठीमागून आलेल्या दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी वाट देण्याच्या प्रयत्नात असताना ट्रकचालकाने अचानक गाडी बाजूला ट्रॅक्‍टरच्या पाठीमागे गाडी ओढली. याच दरम्यान मोटारसायकल वरून ट्रकच्या मध्यभागी अडकली व सुमारे दीडशे फुटांपर्यंत ती फरफटत गेली.

चालक सुतार मोटारसायकलवरून बाजूला फेकले गेले त्यांना गंभीर दुखापत झाली. तर मागे बसलेल्या पल्लवी सुतार ह्या धडक लागताच ट्रकच्या मध्यभागी जाऊन पडल्या व त्यांच्या अंगावरील साडी मालट्रकच्या मध्यभागी असलेल्या जॉईंटमध्ये अडकून जॉईंटला साडी गुंडाळली. यावेळी त्या महामार्गावर फरपटत गेल्या त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबवला. थांबवल्यानंतर त्या गाडीच्या खालून बाहेर आल्या व स्वतःच्या गाडीला अडकवलेली पिशवीतील साडी काढून परिधान केली. मोटारसायकल पाठीमागील चाकात अडकून चक्काचूर झाली. सुतार यांना स्थानिक लोकांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.  

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com