विनामास्क फिरणाऱ्या 52 जणांवर चंदगडमध्ये कारवाई

सुनील कोंडुसकर
Thursday, 25 February 2021

नगरपंचायतीकडून विनामास्क नागरिकांवर कडक कारवाईचा अंमल सुरू केला आहे.

चंदगड : शहरात नगरपंचायतीकडून विनामास्क नागरिकांवर कडक कारवाईचा अंमल सुरू केला आहे. प्रमुख ठिकाणांसह बाजारपेठ, विविध संस्थांच्या कार्यालयांमधून विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांत 52 नागरिकांवर कारवाई करून पाच हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

राज्याच्या विविध भागांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जाहीर सभा, संमेलने, यात्रा, जत्रा यांना नियम लागू केले आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे. काही जण बेफिकीर वागतात. नियमांकडे कानाडोळा करतात, अशांवर कारवाई केली जाते. येथील संभाजी चौक, गुरुवार पेठ, कैलास चौक, बसस्थानक परिसरात नगरपंचायतीने तपासणी कडक केली आहे.

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना 100 रुपयांचा दंड केला जातो. काल (ता. 23) व आज मिळून दोन दिवसांत 52 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी नियमांचा वापर करावा, कोरोनाच्या लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Against 52 Unmasked People In Chandgad Kolhapur Marathi News