शासनाने निधीची तरतूद केल्यास व्याजातून नाट्यगृहांमध्ये सुविधा देणे शक्‍य ; प्रशांत दामले

actor Prashant Damle drama Tour in  kolhapur marathi news
actor Prashant Damle drama Tour in kolhapur marathi news

कोल्हापूर :  राज्यात सुमारे पासष्ट नाट्यगृहे आहेत. मात्र, आठ ते दहा नाट्यगृहांचा अपवाद वगळता सर्व नाट्यगृहांची दुरावस्था झाली आहे. राज्यातील एकूणच नाट्यगृहांसाठी शासनाने एकरकमी भरघोस निधीची तरतूद केल्यास त्याच्या व्याजातून नाट्यगृहांमध्ये सुविधा देता येणे शक्‍य आहे. त्यासाठी अपेक्‍स बॉडीची स्थापना करून त्याअंतर्गत नाट्यगृहांसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत आज प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. 


सध्या  दामले यांचे "एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग राज्यभरात प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. शुक्रवार (ता.19) या नाटकाचा पश्‍चिम महाराष्ट्र दौरा होणार असून वीस फेब्रुवारीला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी चार आणि साडेसातला दोन प्रयोग होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ""नाट्यगृह बांधणे सोपे आहे. मात्र, त्याचा मेंटेनन्स खर्च महापालिकांना परवडत नाही. त्यामुळे शासनानेच पुढाकार घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊननंतर आता नाट्यगृहांत नाटक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलरेल सुरू झाली आहे. सोलापूर महापालिकेचा अपवाद वगळता उर्वरित बहुतांश सर्व महापालिकांनी नाट्यगृहांच्या भाड्यात सवलत दिली आहे. काही अभिनेता, अभिनेत्रींनी आपले मानधन कमी केले आहे. त्याशिवाय प्रवास खर्चातही बसेस मालकांनी सवलत दिली आहे. वृत्तपत्रांनीही जाहिरात दर कमी करून निर्मात्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे नाटक आता हळूहळू बहरू लागले आहे.'' दरम्यान, यावेळी नाट्य वितरक गिरीश महाजन उपस्थित होते.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com