
गडहिंग्लज (कोल्हापूर) : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लॉकडाउन आहे. यामध्ये गरीब लोकांचे विविध प्रश्न डोके वर काढत आहेत. शासनाने यातून मार्ग काढत अधिकाधिक गरिबांना सवलती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून संजय गांधी निराधार योजनेतंर्गत विविध गरीब घटकांना दरमहा मिळणारी पेन्शन आता तीन महिन्यांचे एकदम (ऍडव्हान्स) देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे, डॉ. एम. व्ही. अथणी, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, "राज्य आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांमध्ये लॉकडाउनमुळे अस्वस्थता होती. घरी पाठवण्याची मागणी सातत्याने होत असल्याने शासनाने निर्णय घेतला. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटीचे नियोजन केले. गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधून मध्यप्रदेशला 137, उत्तरप्रदेशातील 212 व बिहारचे 550 मजुरांना गावाकडे पाठवले आहे. उपविभागात बाहेरून आलेल्यांची संख्याही मोठी आहे. आजऱ्यात 1212, गडहिंग्लजला 824 तर चंदगडमध्ये 728 लोक पुणे, मुंबईहून दाखल झाले आहेत. कोरोना खेड्यापर्यंत पोहचू नये, कुटुंबे सुरक्षित रहावीत म्हणून या उपविभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र योद्धाप्रमाणे लढत आहेत. त्यांचे कौतुक करावे लागेल.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ते म्हणाले, ""लॉकडाउनमध्ये छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. गरिबांच्या हाताला काम नाही. मजूर अस्वस्थ आहेत. केंद्राने पॅकेजीस जाहीर केले. परंतु, राज्याच्या वाट्याचे जीएसटीचे 21 हजार कोटी दिलेच नाहीत.'
कोरोनाबरोबर जगायला शिका
कोरोना इतक्यात नष्ट होईल याची शाश्वती नाही. त्यावर अजून लसही उपलब्ध नाही. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे दो गज दूरी ठेवून आणि हात स्वच्छ धुवून कोरोनाबरोबर माणसांनी जगायला शिकले पाहिजे. या संकटावर मात केली पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.