दीड महिन्यानंतर मिळणार 'त्या' जहाजाला न्याय

after one and half month the boat released from mirya port in ratnagiri
after one and half month the boat released from mirya port in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळात भरकटून गेले दीड महिना मिऱ्या बंधाऱ्याजवळ अडकून पडलेले जहाज काढण्यात येणार आहे. बसरा स्टार एजन्सीकडून बंदर विभागाला तसे कळविण्यात आले असून ही कार्यवाही पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल. खवळलेला समुद्र शांत झाल्यानंतर आधी दुरुस्ती केली जाणार आहे. 

जुलैच्या सुरवातीलाच आलेल्या चक्रीवादळामुळे समुद्र प्रचंड खवळलेला होता. यामध्ये गोव्याकडून दुबईकडे जाणारे बसरास्टार कंपनीचे जहाज अडकले होते. ते जहाज प्रवास करत रत्नागिरीतील भगवती बंदराजवळ येऊन थांबले. नांगर टाकून ते सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. वारा आणि पाण्याला असलेल्या करंटमुळे ते जहाज भरकटले. ते जहाज मिऱ्या किनाऱ्यावर लागले. गेले दीड महिना ते तिथेच उभे आहे. सुरवातीला जहाजातील २५ हजार लिटर डिझेल काढले. त्यानंतर ते जहाज काढण्यासंदर्भात कंपनीने तत्काळ कार्यवाही करावी, असे पत्र बंदर विभागाकडून दिले होते. त्याचा पाठपुरावाही बंदर विभागाकडून सुरू होता; मात्र कंपनीकडून जहाज काढण्याविषयी कोणतीच कार्यवाही केली जात नव्हते. संबंधित कंपनीकडून जहाज पावसाळ्यानंतर काढले जाईल, असे बंदर विभागाला कळवले आहे.

सध्या समुद्र खवळलेला असल्यामुळे ते बाहेर काढणे अशक्‍य आहे. तत्पूर्वी लाटांमुळे जहाजाचा तळाकडील भाग नादुरुस्त झाला असून पाणी आतमध्ये शिरले आहे. त्याची दुरुस्ती आवश्‍यक आहे. हे काम सुरू करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. प्रत्यक्षात जहाज काढण्यासाठी नोव्हेंबरमध्ये सुरवात केली जाईल अशी शक्‍यता आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असल्याने जहाज बंधाऱ्याच्या दिशेने झुकलेले आहे. लाटांच्या तडाख्यात जहाजाची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे. त्यासाठी येणारा खर्च लाखो रुपयांच्या घरात जाऊ शकतो.

"जहाज काढण्यासंदर्भात दिलेल्या पत्राला जहाजाच्या कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. पावसाळी परिस्थिती निवळल्यानंतर जहाज काढण्यासाठी कंपनीकडून कार्यवाही होईल."

- कॅ. संजय उगलमुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com