भाजप-एमआयएम एकत्रच ; मुश्रीफांचा आरोप

After the review meeting held at the Collectorate Mr. Mushrif spoke to reporters today kolhapur
After the review meeting held at the Collectorate Mr. Mushrif spoke to reporters today kolhapur
Updated on

कोल्हापूर : भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयएम खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर-मस्जिद खुली करा म्हणून हातात हात घालून काम करताहेत असे वाटत आहे. मंदिर-मश्‍चित निश्‍चितपणे खुली केली जातील. पण कोरोनामुळे गरीब असो किंवा श्रीमंत लोकांचा रतिब लावल्यासारखा मृत्यु होत आहे, याचे गांभिर्य ठेवले पाहिजे, अशी टिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि एमआयएमच्या खासदारांवर केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर श्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


श्री मुश्रीफ म्हणाले, आपण आपले सगळे सखे-सोयरे गमावत आहे. कोरोनामुळे माझ्या सख्या बहिणीचा नवरा, सख्या भाचीचा नवरा गमावला. मला बहिणेचे सांत्वनही करायला जाता आले नाही. एका एका घरातील दोन -तीन लोक कोरोनामुळे जात आहेत. तरीही मश्‍चिद उघडा आणि देऊळ उघडा कशासाठी. धार्मिक स्थळे नक्की उघडली जातील. याबद्दल अनेकांची अनेक मते आहे. याचा अभ्यास करायला पाहिजे. पण भाजप आणि एमआयएम मिळून हे जे काही काम करत आहेत. ते लोकहिताचे नसल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे
...  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com